CoronaVirus : महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या वाटेवर! केंद्र सरकारचा इशारा; लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 02:20 AM2021-03-17T02:20:47+5:302021-03-17T07:00:43+5:30

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. केंद्रीय पथकाने अलीकडेच महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी केली.

CoronaVirus Maharashtra on the way to the second wave! Central government warning; Suggestions for speeding up vaccination | CoronaVirus : महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या वाटेवर! केंद्र सरकारचा इशारा; लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना

CoronaVirus : महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या वाटेवर! केंद्र सरकारचा इशारा; लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना

googlenewsNext

नवी दिल्ली : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून, देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याची ही चिन्हे आहेत, सबब लसीकरणाचा वेग वाढविला जावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. (CoronaVirus Maharashtra on the way to the second wave! Central government warning; Suggestions for speeding up vaccination)
 
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. केंद्रीय पथकाने अलीकडेच महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी केली. त्या पाहणीच्या आधारावरच केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात पुढील मुद्दे मांडले आहेत. 

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ कायम; यंत्रणांसमोर चिंता
मुंबईत मंगळवारी १ हजार ९२२ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांचा आकडा ३ लाख ४७ हजार ५८१ वर पोहोचला आहे. 
२,२३,०००+ - देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा  
राज्यात नवे रुग्ण - १७,८६४
एकूण बाधित - २३,४७,३२८
एकूण मृत्यू - ५२,९९६

१२,७४,००० डोस मिळणार -
महाराष्ट्राला १८ मार्चपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे आणखी १२,७४,००० डोस प्राप्त होणार आहेत. राज्यात लसींचा तुटवडा जाणवू दिला जाणार नसल्याचेही राजेश भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे.

‘आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या’
कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या. अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री 
डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली. 

पंतप्रधानांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा - 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.

जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचे ताशेरे
- कोरोनाबाधितांचा शोध घेणे, नमुने गोळा करणे, चाचण्या करणे यासंदर्भात मर्यादित प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. 
- औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालय, तसेच नाशिकमधील वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. 
- यासंदर्भात सखोल तपास होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या बदलत्या स्थितीबाबत जिल्हा प्रशासने फारशी गंभीर नाहीत. 
- आपण केलेल्या बंदोबस्तावर ते खूश असून, हे योग्य नाही. त्यांनी प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले.

३४ दिवसांमध्ये २५४% वाढ
सक्रिय रुग्णांच्या संख्येत ११ फेब्रुवारी रोजी राज्यात ३६,९१७ एवढे कोरोनाचे उपचाराधीन रुग्ण होते. आता १५ मार्च रोजी १,३०,५४७  एवढे सक्रिय रुग्ण आहेत. म्हणजेच ३४ दिवसांमध्ये यात जवळपास २५४ टक्के वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने राज्याला सुनावले -
- बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्याची प्रक्रियाही धिम्या गतीने
- शहरी, तसेच ग्रामीण भागातही लोकांमध्ये कोरोनाविषयी बेफिकिरी, शिस्तीचे पालन होत नाही
 

Web Title: CoronaVirus Maharashtra on the way to the second wave! Central government warning; Suggestions for speeding up vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.