CoronaVirus: महाराष्ट्राच्या दुरुस्तीमुळे मृतांची आकडेवारी 4 हजारांपर्यंत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 06:26 AM2021-06-13T06:26:50+5:302021-06-13T06:27:09+5:30

गेल्या सत्तर दिवसांतील सर्वात कमी नव्या रुग्णांची नोंद

CoronaVirus: Maharashtra's recorrections brought the death toll to 4,000 | CoronaVirus: महाराष्ट्राच्या दुरुस्तीमुळे मृतांची आकडेवारी 4 हजारांपर्यंत वाढली

CoronaVirus: महाराष्ट्राच्या दुरुस्तीमुळे मृतांची आकडेवारी 4 हजारांपर्यंत वाढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे ४००२ जण मरण पावले अशी नोंद झाली असली तरी त्यातील २६१७ मृत एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यापैकी २२१३ जण हे आधी दाखविण्यात आलेच नव्हते. महाराष्ट्राने ती माहिती शुक्रवारी उघड केली. त्यामुळे ही संख्या वजा केली असता राष्ट्रीय स्तरावर १७८९ जणच मरण पावले असल्याचे दिसून येते. मागील सत्तर दिवसांतील कोरोनाचे सर्वात कमी नवे रुग्णही आढळले आहेत.

याआधी बिहारनेही कोरोना मृतांच्या आकड्यात बुधवारी ३,९७१ने दुरुस्ती केल्याने त्यावेळी ही आकडेवारी ६१३८पर्यंत वाढली होती. गेल्या चोवीस तासांत ८४,३३२ नवे रुग्ण सापडले तर १ लाख २१ हजार ३११ रुग्ण बरे झाले. २ कोटी ९३ लाख ५९ हजार १५५ कोरोना रुग्णांपैकी २ कोटी ७९ लाख ११ हजार ३८४ जण बरे झाले आहेत. साथ सुरू झाल्यापासून ३ लाख ६७ हजार ८१ जण मरण पावले आहेत.

उपचार घेणाऱ्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत ४०,९८१ने घट झाली आहे. १० लाख ८० हजार ६९० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. ९५.६७ टक्के जण कोरोनातून बरे झाले आहेत. दर आठवड्याचा, दररोजचा संसर्ग दर अनुक्रमे ४.९४ टक्के व ४.३९ टक्के आहे. सलग १९व्या दिवशी संसर्ग दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.२५ टक्के आहे.
३२.६२ कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने दिली. आतापर्यंत कोरोना लसीचे २४ कोटी ९६ लाख ३०४ डोस दिले आहेत. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील ३.८५ कोटी जणांना कोरोना लस देण्यात आली. 

मेक्सिकोतील एक चतुर्थांश
लोक कोरोनाबाधित

n    मेक्सिकोतील १२.६ कोटी लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अंदाज आहे.
n    तिथे राष्ट्रीय स्तरावर आरोग्यविषयक सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील निष्कर्षांत म्हटले आहे की, ३.११ कोटी लोक कोरोनाबाधित झाले आहेत.

१७ कोटी
६० लाख

जगात  कोरोना रुग्ण असून त्यातील १५ कोटी ९६ लाख जण बरे झाले.
६ लाख १४ हजार
जणांचा बळी गेला व ५३ लाख ४५ हजार जणांवर उपचार सुरू आहेत.

३८ लाख लोक
मरण पावले असून १ कोटी २२ लाख जणांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत असून तिथे ३ कोटी ४३ लाख बाधितांपैकी २ कोटी ८३ लाख लोक बरे झाले. 

Web Title: CoronaVirus: Maharashtra's recorrections brought the death toll to 4,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.