Coronavirus : ममता बॅनर्जींना बंधुशोक, धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 13:13 IST2021-05-15T13:12:13+5:302021-05-15T13:13:11+5:30
Coronavirus News: असीम बंडोपाध्याय यांच्यावर कोलकाता येथील मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या एका महिन्यापासून ते कोरोनाशी झुंजत होते.

Coronavirus : ममता बॅनर्जींना बंधुशोक, धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन
कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे धाकटे भाऊ असीम बंडोपाध्याय यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. असीम बंडोपाध्याय गेल्या महिनाभरापासून कोरोनावर उपचार घेत होते. दरम्यान, आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यातच त्यांचा प्राणज्योत मालवली. बंडोपाध्याय यांच्या कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असीम बंडोपाध्याय यांच्यावर कोविड प्रोटोकॉलचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात येतील. (Mamata Banerjee's younger brother Ashim Bandhopadhay passes away )
असीम बंडोपाध्याय यांच्यावर कोलकाता येथील मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या एका महिन्यापासून ते कोरोनाशी झुंजत होते. दरम्यान, एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी त्यांची प्रकृती बिघडली होती.
कोलकाता मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉय आलोक रॉय यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांचे धाकटे भाऊ असीम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.