Coronavirus : भयंकर! कोरोनावरचा 'तो' वाद जीवावर बेतला, तरुणाची गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 04:07 PM2020-04-05T16:07:53+5:302020-04-05T16:18:31+5:30
Coronavirus : कोरोनावरून सुरू झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. वादानंतर तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
प्रयागराज - जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने असंख्य बळी घेतले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनावरून सुरू झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. वादानंतर तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. प्रयागराजमधील करेली येथे ही भयंकर घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करेली परिसरात रविवारी ( 5 एप्रिल) सकाळी कोरोनावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. लोटन निषाद असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. चहाच्या दुकानाजवळ ही घटना घडली. उपस्थित लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे आदेशही दिले आहेत.
Coronavirus : सॅनिटायझर वापरून दिवा लावणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण https://t.co/qKGSHiqacS#coronavirusinindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 5, 2020
रविवारी सकाळी चहाच्या दुकानासमोर काही लोकांचा एक ग्रूप चर्चा करत बसला होता. देशभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांवर ते चर्चा करत होते. चर्चेचं रुपांतर पुढे वादात झालं आणि तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 वर पोहोचला आहे.
Coronavirus : ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर! एका दिवसात तब्बल 708 जणांचा मृत्यूhttps://t.co/qx5Xo3Z6Kk#CoronaVirus
— Lokmat (@MiLOKMAT) April 5, 2020
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 64,754 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 12,03,459 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 2,46,803 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. ब्रिटनमध्ये शनिवारी (5 एप्रिल) एकाच दिवसात कोरोना व्हायरसमुळे 708 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 40 हजारांहून अधिक झाला आहे. तर ब्रिटनमध्ये आतापर्यंत 4313 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर! एका दिवसात तब्बल 708 जणांचा मृत्यू
Coronavirus : सॅनिटायझर वापरून दिवा लावणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण
Coronavirus : ...म्हणून 'पबजी' 24 तास राहणार बंद
Coronavirus : धक्कादायक! ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास