Coronavirus: खळबळजनक! मुस्लीम धार्मिक कार्यक्रमात किती जणांना कोरोना?; ४ राज्यात शोधमोहीम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 11:30 AM2020-03-27T11:30:42+5:302020-03-27T11:40:13+5:30

दिल्लीतील तबलीगी जमातीनं एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात असणारे धर्मगुरु आणि अन्य लोक देशभरात पसरले आहेत.

Coronavirus: Many States Are Tracing Preachers Of Tablighi Jamaat Who Attended A Congregation In Delhi pnm | Coronavirus: खळबळजनक! मुस्लीम धार्मिक कार्यक्रमात किती जणांना कोरोना?; ४ राज्यात शोधमोहीम सुरु

Coronavirus: खळबळजनक! मुस्लीम धार्मिक कार्यक्रमात किती जणांना कोरोना?; ४ राज्यात शोधमोहीम सुरु

Next
ठळक मुद्देयाच कार्यक्रमात सहभागी झालेल्या काश्मीरमधल्या ६५ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्वाधिक लोक मलेशिया आणि इंडोनेशिया येथील नागरिक होतेदिल्लीतील तबलीगी जमातीनं एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १४ एप्रिलपर्यंत देशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद असणार आहेत. लोकांनी एकत्र जमू नये, गर्दी करु नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिग गरजेचे आहे. तरीही काही लोकांना कोरोनाचं गांभीर्य नाही.

दिल्लीतील तबलीगी जमातीनं एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात असणारे धर्मगुरु आणि अन्य लोक देशभरात पसरले आहेत. यातील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक राज्यात सरकार या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यांपैकी काही जणांचा कोरोना असल्याची शक्यता आहे. देशातील ४ राज्यांमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करतायेत. यातीलच एका व्यक्तीने बुधवारी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर या व्यक्तीला घरीच विलग राहण्यास सांगितले. या चाचणीचा रिपोर्टची प्रतिक्षा केली जात आहे. मात्र याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं सुरु आहे.

रिपोर्टनुसार याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या काश्मीरमधल्या ६५ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्ताच्या आधारे या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्वाधिक लोक मलेशिया आणि इंडोनेशिया येथील नागरिक होते. २७ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान कुआलालांपूर मध्ये इस्लामिक मार्गदर्शकाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते भारतात आले होते. दिल्लीत मुक्काम करण्याच्या वेळी हे लोक अनेक लोकांच्या संपर्कात आले होते. हे लोक उत्तर प्रदेश, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबार येथेही गेले होते. आता दिल्ली, जम्मू काश्मीर, तामिळनाडू आणि तेलंगाणा सरकार या लोकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत आहे.

काय आहे तबलीगी जमात?

१९२६ मध्ये मौलाना मोहम्मद इलियास नावाच्या इस्लामिक स्कॉलरनं तबलीगी जमातीची सुरुवात केली होती. हरियाणाच्या मेवात येथून सुरुवात झालेली ही चळवळ आता १५० देशांमध्ये पसरली आहे. या संघटनेचा कोणताही पदाधिकारी अथवा सदस्यांची नोंद नाही. हे लोक लपून राहतात, राजकारणाशी संबंध ठेवत नाहीत. मस्जिदींना चालना देण्यासाठी ही संघटना काम करते.

महत्त्वाच्या बातम्या

गृह, वाहन अन् इतर प्रकारच्या कर्जदारांना दिलासा; RBIनं केली मोठी घोषणा

...फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय नेते सरसावले; पाहा कोणत्या नेत्याने किती मदत केली?

‘लॉकडाऊन’ बाधितांसाठी १.७० लाख कोटींचे पॅकेज

राज्यात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी चिंताजनक; वयोवृद्धांपेक्षा ‘या’ वयोगटात सर्वाधिक रुग्ण

 

Web Title: Coronavirus: Many States Are Tracing Preachers Of Tablighi Jamaat Who Attended A Congregation In Delhi pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.