CoronaVirus News : चिंताजनक! देशभरात 24 तासांत 2487 जण कोरोना पॉझिटिव्ह, 83 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 08:19 PM2020-05-03T20:19:31+5:302020-05-03T20:26:42+5:30
सध्या सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्राची आहे. येथे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 12 हजारवर पोहोचली आहे. तर 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी देशात तिसऱ्यांदा लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही कोरोनाबाधित रुग्नांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत तब्बल 2487 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर कोरोनाच्या चपाट्यात आल्याने तब्बल 83 जणांचा मृत्यू झाला आहे. रोज येत असलेल्या आकड्यांचा विचार करता हा आकडा फार मोठा आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या 40,263 वर पोहोचली आहे. यापैकी 10,887 रुग्ण बरे झाले आहेत. तर 28,070 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता देशात कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या 1306 झाली आहे.
2487 new #COVID19 positive cases, 83 deaths reported in the last 24 hours: Ministry of Health and Family Welfare https://t.co/rx1r2lyxEe
— ANI (@ANI) May 3, 2020
CoronaVirus News: आनंदाची बातमी; 10 हजार कोरोनाग्रस्त ठणठणीत, डबलिंग रेट 12 दिवसांवर
सध्या सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्राची आहे. येथे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 12 हजारवर पोहोचली आहे. तर 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दिल्लीतही कोरोनाचे नवे रुग्ण समोर येतच आहेत. बिहार, राजस्थान, गुजरात, यूपी आणि मध्यप्रदेशसह देशाच्या इतर भागांतही दिवसागणिक कोरोना रुग्ण समोर येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत असतानाही, करोना व्हायरसचा कहर कमी होताना दिसत नाही.
रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग