CoronaVirus News : 'त्यांनी माझा व्हेंटिलेटर काढला, मी आता जगणार नाही'; 'तो' Video शेअर करून रुग्णाने सोडला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 11:26 AM2020-06-29T11:26:46+5:302020-06-29T11:44:17+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. याच दरम्यान रुग्णालयातील भयंकर प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान रुग्णालयातील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. हैदराबादमधील एका कोरोना रुग्णाने मृत्यू आधी एक व्हिडीओ करून तो आपल्या वडिलांना पाठवला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये मुलाने 'बाय डॅडी, त्यांनी माझा व्हेंटिलेटर काढला आहे, आता मी जगणार नाही' असं म्हटलं आहे. यानंतर काही वेळातच मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
CoronaVirus News : शरीरात कसा पसरतो कोरोना व्हायरस?, जाणून घ्याhttps://t.co/2LOl5tuMSI#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 29, 2020
कोरोनावर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलाचा तो शेवटाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील एका रुग्णालयात उपचारासाठी कोरोनाग्रस्ताला दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णाने मृत्यू आधी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये "त्यांनी माझा व्हेंटिलेटर काढला आहे. मला श्वास घ्यायला त्रास होत आहे. गेल्या तीन तासांपासून परत व्हेंटिलेटर लावण्यासाठी मी विनंती करत आहे मात्र ते माझं ऐकत नाही आहेत. माझ्या हृदयाने काम करणं बंद केलं आहे. डॅडी मला श्वास घेणं शक्य नाही. आता मी जगणार नाही... बाय ऑल, बाय डॅडी" असं म्हटलं आहे.
CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार; वेगाने रुग्णांवर उपचार होणार https://t.co/fHYlUVhKNe#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 28, 2020
मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र व्हिडीओ पाठवल्यानंतर काही वेळातच मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. माझ्या मुलाने मदत मागितली, पण त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही असं देखील वडिलांनी म्हटलं आहे. रुग्णालय प्रशासनाला याबाबत विचारलं असता त्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात 'या' देशाने लढवली अनोखी शक्कलhttps://t.co/446ZwhWIN2#coronavirus#CoronaLockdown#Travel
— Lokmat (@MiLOKMAT) June 28, 2020
महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनचा खंडाळा घाटात अपघात
CoronaVirus News : लढ्याला यश! शरीरात कोरोनाचा 'मित्र' आणि 'शत्रू' कोण?; संशोधनातून नवा खुलासा
"विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत"
CoronaVirus News : पर्यटकांना 'या' देशाने दिली स्पेशल ऑफर, कोरोना झाला तर देणार तब्बल 2 लाख
TikTok वापर करताय?, लाखो युजर्सचा डेटा धोक्यात; 'हा' Video नक्की पाहा
Video - ...म्हणून Zomato च्या कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा, जाळले कंपनीचे टी-शर्ट
CoronaVirus News : जगातलं सगळ्यात मोठं कोविड केअर सेंटर पाहिलंत का?... आपल्याच राजधानीत आहे!