CoronaVirus News: कोरोनाचे १०० दिवस: जगाच्या तुलनेत भारत नेमका कुठे? पुढे काय होणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 08:05 AM2020-05-09T08:05:07+5:302020-05-09T08:07:47+5:30

CoronaVirus marathi news: देेशातील कोरोना संक्रमणाचा वेग वाढला; कोरोनाबाधितांची संख्या ६० हजाराच्या जवळ

CoronaVirus marathi news 100 days of corona how india fared compared to other countries kkg | CoronaVirus News: कोरोनाचे १०० दिवस: जगाच्या तुलनेत भारत नेमका कुठे? पुढे काय होणार? जाणून घ्या

CoronaVirus News: कोरोनाचे १०० दिवस: जगाच्या तुलनेत भारत नेमका कुठे? पुढे काय होणार? जाणून घ्या

Next

नवी दिल्ली: देशात पहिला कोरोना रुग्ण सापडून आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. ३० जानेवारीला केरळच्या तृश्शूरमध्ये चीनच्या वुहानमधून आलेल्या एका विद्यार्थ्याला ताप जाणवू लागला. त्याच्या गळ्याला सूज आली होती. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. देशातला हा कोरोनाचा पहिला रुग्ण ठरला. त्यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडू लागले. सध्या देशातला कोरोना रुग्णांचा आकडा ६० हजाराच्या आसपास पोहोचला आहे.

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतरच्या पहिल्या ३० दिवसांत रुग्णांची संख्या फारशी वाढली नाही. त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होत गेली. पहिल्या ५० दिवसात देशात कोरोना रुग्णांची संख्या २०० पेक्षा कमी होती. एप्रिलला सुरुवात होताच कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढू लागली. मे महिना सुरू होताच देशात दररोज कोरोनाचे २ हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. 

अमेरिका, ब्रिटनची तुलना करता पहिल्या १०० दिवसांमध्ये भारतात कोरोनाचा संसर्गाचा वेग कमी आहे. अमेरिकेत २१ जानेवारीला पहिला रुग्ण आढळला होता. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत अमेरिकेत कोरोनाचे ६८ रुग्ण होते. मार्चच्या अखेरीस हा आकडा २ लाखांपर्यंत पोहोचला. १०० व्या दिवशी हाच आकडा तब्बल १० लाखांवर गेला होता.

ब्रिटनमध्येही कोरोनाचा हाहाकार माजवला. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला सापडला. तर ब्रिटनमध्ये त्याच्या एका दिवसानंतर म्हणजेच ३१ जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ब्रिटनमध्ये कोरोनाचे २३ रुग्ण होते. मार्चच्या अखेरपर्यंत हाच आकडा २५ हजाराच्या घरात पोहोचला. ७ मे रोजी ब्रिटनमधील कोरोनाबाधितांची संख्या २ लाखांवर गेली. 

मे महिना सुरू होताच देशातील कोरोना संक्रमणाचा वेग वाढला. आता अमेरिका आणि ब्रिटनच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. अमेरिका, ब्रिटनमधील कोरोनाबाधितांची संख्या सध्याच्या घडीला खूप जास्त आहे. पण सध्या तिथे आढळून येत असलेल्या रुग्णांचं प्रमाण कमी आहे. मात्र भारतात हेच प्रमाण खूप जास्त आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवायचं असल्यास बाधितांवर वेळीच उपचार होणं गरजेचं आहे. त्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. मात्र टेस्ट किट्सची अपुरी संख्या, आरोग्य सोयी सुविधा, बेड्सची कमतरता, प्रचंड लोकसंख्या यामुळे देशासमोर मोठं आव्हान आहे.
 

Web Title: CoronaVirus marathi news 100 days of corona how india fared compared to other countries kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.