CoronaVirus News : लग्नासाठी 50 तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी, जाणून घ्या गृहमंत्रालयाचे 'हे' नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 07:35 PM2020-05-05T19:35:07+5:302020-05-05T19:43:44+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचे एकूण 46,433 रुग्ण झाले असून गेल्या 24 तासांतील आकडा हा चिंता वाढविणारा आहे. या काळात देशभरात 3900 नवीन रुग्ण सापडले आहेत.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही सातत्याने वाढत आहे. देशात कोरोनाचे एकूण 46,433 रुग्ण झाले असून गेल्या 24 तासांतील आकडा हा चिंता वाढविणारा आहे. या काळात देशभरात 3900 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 1020 रुग्ण बरे झाले आहेत. धक्कादायक म्हणजे आज सर्वाधिक 195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने सार्वजनिक ठिकाणांसाठी नियम जारी केले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता लग्नसोहळ्याला परवानगी देण्यात आली असून त्यासाठी काही अटी-शर्थींचं पालन करावं लागणार आहे. लग्नासाठी 50 आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी देण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक नागरिकांच्या एकत्र येण्यावर मनाई आहे. तर अंत्यविधीला 20 पेक्षा अधिक नागरिक सहभागी होऊ शकत नाही. लग्न समारंभात आणि अंत्यसंस्कारावेळीही सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन आवश्यक आहे.
To maintain social distancing, gathering of not more than 50 persons are allowed at wedding functions and not more than 20 persons at last rites of deceased persons: Punya Salila Srivastava, Joint Secretary, Ministry of Home Affairs (MHA) #COVID19pic.twitter.com/S2VnxxxZRv
— ANI (@ANI) May 5, 2020
केंद्रीय गृहमंत्रालयाने आतापर्यंत 62 विशेष ट्रेन स्थलांतरीत मजुरांसाठी चालवण्यात आल्या आहेत. देशातील विविध भागातून या विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. या विशेष ट्रेनद्वारे आतापर्यंत 70 हजार प्रवाशांना सोडण्यात आले आहे. जवळपास 13 ट्रेन चालवण्यात येतील अशी माहिती दिली आहे. तसेच खासगी कार्यालये किंवा संस्थांच्या कार्यालयांमध्ये थर्मल स्कॅनिंग, मास्क, हॅण्डवॉश आणि सॅनिटायजर आवश्यक आहे. कार्यालयांमध्ये आणि कंपन्यांच्या बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
The offices that are operational now must ensure thermal scanning of employees.The incharge must ensure sufficient availability of face masks&sanitisers. Social distancing norms must be followed. Employees must be registered on Aarogya Setu app:Joint Secy,Ministry of Home Affairs pic.twitter.com/dYYXnzSdPG
— ANI (@ANI) May 5, 2020
कामाच्या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी करणं बंधनकारक असेल. याची जबाबदारी कंपनी किंवा संस्थेच्या प्रमुखांवर असणार आहे. ऑफिसेस किंवा कामाची ठिकाणं वेळोवेळी सॅनिटाइज केली गेली पाहिजे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या जवळच्या रुग्णालयांची यादी कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जावी. तसेच कामाच्या ठिकाणी सफाई आणि स्वच्छता राखण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे असं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.
CoronaVirus News : Hydroxychloroquine की Remdesivir... कोरोनावर कोणतं औषध प्रभावी?, तज्ज्ञ म्हणतात...https://t.co/s9vKOiF6H0#coronaupdatesindia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 5, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 2,52,675 जणांचा मृत्यू; अमेरिकेत परिस्थिती गंभीर
CoronaVirus News : "...हे तर आमच्याकडून देशासाठी केलेलं दान", मद्यप्रेमीचा 'हा' Video व्हायरल
CoronaVirus News : खोकल्याचं औषध घेत असाल तर वेळीच व्हा सावध, वाढू शकतो कोरोनाचा धोका?