CoronaVirus News : धक्कादायक! 'या' 8 राज्यांत कोरोनाचे तब्बल 90 टक्के रुग्ण, 86 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 09:39 PM2020-07-09T21:39:54+5:302020-07-09T21:51:18+5:30
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 7,67,296 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4,76,377 लोक बरे झाले आहेत. तर 21,129 लोकांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरस संक्रमणाने देशात थैमान घातले आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढतच चालला आहे. आतापर्यंत तब्बल 7.67 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4.76 लाख लोक बरे झाले असून 2.69 अॅक्टिव रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी तब्बल 90 टक्के रुग्ण हे देशातील केवळ 8 राज्यांत समोर आले आहेत.
कोरोनासंदर्भात तयार करण्यात आलेल्या मंत्री गटाने गुरुवारी सांगितले, की देशातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांपैकी तब्बल 90 टक्के रुग्ण हे केवळ महाराष्ट्र, तामिलनाडू आणि दिल्ली सह आठ राज्यांमध्ये आहेत. तर अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हे केवळ 49 जिल्ह्यांत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी जीओएमची केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली 18वी बैठक पार पडली. यात त्यांनी भारतातील कोरोनाच्या सद्य स्थितीवर माहिती दिली.
देशातील 86 टक्के मृत्यू केवळ 6 राज्यांत -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जीओएमने माहिती दिली, की देशातील 86 टक्के कोरोनाबाधितांचे मृत्यू हे केवळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 6 राज्यांत झाले आहेत. तर 80 टक्के मृत्यू हे देशातील केवळ 32 जिल्ह्यात झाले आहेत.
देशातील या 8 राज्यांत 90 टक्के अॅक्टिव्ह रुग्ण -
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 2,69,789 एवढे अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. यापैकी 90 टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 7,67,296 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4,76,377 लोक बरे झाले आहेत. तर 21,129 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी 6 हजार 875 नवे कोरोनाबादित -
महाराष्ट्रात गुरुवारी 6 हजार 875 कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर 219 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 30 हजार 599 झाली असून बळींचा आकडा 9 हजार 667 झाला आहे. सध्या राज्यात 93 हजार 652 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 1 लाख 27 हजार 259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या -
ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा
CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...
कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी