CoronaVirus News : कोरोना योद्ध्यांसाठी 'ही' औषधी ढाल फायदेशीर ठरणार, व्हायरसपासून रक्षण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 06:06 PM2020-06-01T18:06:44+5:302020-06-01T18:16:57+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे.
डेहराडून - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनावर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. जगभरात लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणं, क्वारंटाईन असे उपाय केले जात आहेत. या संकटाच्या काळात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही विविध उपाय केले जात आहेत. उत्तराखंडच्या आयुष विभागाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आता आयुष रक्षा किट तयार केलं आहे.
किटची खासियत म्हणजे आयुष रक्षा किट हे सर्वसामान्य नागरिकांसाठी नाही तर कोरोनाविरोधात लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी हे किट आहे. या आयुष रक्षा किटमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मदत मिळेल असा दावा आयुष विभागाने केला आहे. आयुष रक्षा किटमध्ये काही गोष्टी देण्यात आल्या आहेत.
CoronaVirus News : लॉकडाऊन कधी आणि कसा हटवला जावा?, डॉक्टरांनी केला अभ्यासhttps://t.co/NixBTUy869#CoronavirusIndia#coronaupdatesindia#COVID19India#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2020
आयुष रक्षा किटमध्ये आयुष रक्षा काढा (पावडर), अश्वगंधा वटी (टॅबलेट), संशमनी वटी (टॅबलेट) या तीन गोष्टी देण्यात आल्या आहेत. रक्षा किटच्या पॅकेटमधील या गोष्टी 7 आयुर्वेदिक औषधांपासून तयार करण्यात आल्या आहेत. आयुष रक्षा काढ्याची 2 चमचे पावडर 2 कप पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी उकळून प्या. सकाळी आणि संध्याकाळी हा काढा प्यायचा आहे. अश्वगंधा वटी आणि संशमनी वटीची एक एक गोळी सकाळी कोमट पाण्यासह घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
CoronaVirus News : श्रमिक ट्रेन्स मार्ग चुकल्याचा प्रियंका गांधींनी केला होता दावा https://t.co/T0qUjCawx7#CoronavirusIndia#priyankagandhi#IndianRailways#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2020
आयुष विभागाने याचं नियमित सेवन केल्याने फक्त कोरोना व्हायरसच नव्हे तर इतर व्हायरल आजारांविरोधातही लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असा दावा केला आहे. हरिद्वारममधील ऋषिकुल महाविद्यालयाच्या फार्मसीमध्ये हे किट तयार करण्यात आलं आहे. उत्तराखंडचे आयुष मंत्री हरक सिंह रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार या आयुष रक्षा किटमध्ये 15 दिवस पुरेल इतकी सामग्री आहे. 15 दिवसांचा कोर्स करून रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. जोपर्यंत कोरोना व्हायरसविरोधातील लस येत नाही तोपर्यंत आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हा कोरोनापासून बचाव करण्याचा एक मार्ग आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर शाळांमध्ये असू शकते अशी परिस्थितीhttps://t.co/feNpXhx6k0#CoronaUpdatesInIndia#schoolsreopening#Students#education
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लॉकडाऊन कधी हटवावा?, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर शाळेमध्ये शिकवण्याच्या पद्धतीत होऊ शकतात 'हे' बदल
CoronaVirus News : कौतुकास्पद! ...म्हणून नवजात बाळाला नर्सने पाजलं दूध; तुम्हीही कराल सलाम
काय सांगता? पोलीस ठाण्यात चक्क पोपटांनी साक्ष दिली अन् निर्णयही झाला