CoronaVirus News : कोरोनाचा धसका! 'या' शहरात 'कॅश ऑन डिलिव्हरी'वर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 03:11 PM2020-05-12T15:11:45+5:302020-05-12T15:20:07+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या ही 70 हजारांच्या वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे देशात 2293 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अहमदाबाद - देशात गेल्या 24 तासांत देशभरात 3604 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या ही 70 हजारांच्या वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे देशात 2293 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. वेगाने कोरोनाचा संसर्ग होत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नोटांच्या माध्यमातून कोरोना पसरत असल्याची चर्चा होत आहे. याच दरम्यान एका शहरात 'कॅश ऑन डिलिव्हरी' वर बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून यानंतर आता गुजरात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चलनातील नोटांतून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने गुजरातच्या अहमदाबादमध्ये ऑनलाईन डिलिव्हरीसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 'कॅश ऑन डिलिव्हरी' वर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅश ऑन डिलिव्हरी ऐवजी डिजिटल पेमेंट करण्याचा आदेश लोकांना देण्यात आला आहे.
Home delivery has been made mandatorily cashless in Ahmedabad, Gujarat. To prevent spread of #COVID19 through currency notes, it is mandatory to accept digital mode of payments through Unified Payment Interface (UPI)&other platforms:Gujarat Additional Chief Secy Rajiv Kumar Gupta pic.twitter.com/qtN5v2Ac9W
— ANI (@ANI) May 11, 2020
अहमदाबाद महापालिकेने हा निर्णय घेतला असून कॅश ऑन डिलिव्हरीवर बंदी घातली आहे. तसेच महापालिकेने डी मार्ट, बिग बास्केट, बिग बाजार, ओसिया हायपरमार्केट, झोमॅटो, स्वीगी या होम डिलिव्हरी करणाऱ्या मुख्य कंपन्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या 100 टक्के स्क्रिनिंगनंतरच होम डिलिव्हरीची परवानगी दिली जाईल असं देखील महापालिकेने म्हटले आहे. सामानाची डिलिव्हरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेतू अॅपही बंधनकारक करण्यात आले आहे.
CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 9 महिन्यांची गर्भवती नर्स करतेय कोरोनाग्रस्तांची सेवा, पंतप्रधानांनी केलं कौतुकhttps://t.co/SlubvWLeD1#CoronaUpdatesInIndia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2020
15 मेपासून शहरात होम डिलिव्हरीला सुरुवात होईल, तेव्हापासून हा नियम लागू असेल. होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सॅनिटायझर असणे अनिवार्य करण्यात आले आहे. अहमदाबाद महापालिकेअंतर्गत येणाऱ्या भाजी, दूध, फळ आणि किराणा अशा जवळपास 17000 दुकानांसाठी हा नियम लागू असणार असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुजरातमध्ये कोरोनामुळे 396 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी गुजरात सरकारने मोठा दावा केला होता.
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेलhttps://t.co/Arqtj0BgBB#CoronaUpdatesInIndia#COVID19India#healthtips
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2020
CoronaVirus News : कोरोनाला रोखणारा आयुर्वेदिक काढा, 6000 लोकांवर चाचणी केल्याचा गुजरात सरकारचा दावा
कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी आयुर्वेदिक काढा उपयोगी पडत असल्याचा दावा सरकारने केला होता. गुजरातमध्ये राज्यात 3585 लोकांना आयुर्वेदिक काढा देण्यात आला. तर 2625 लोकांना होमिओपॅथी औषधे देण्यात आली. यातील फक्त 11 लोकांनाच कोरोना झाल्याचं समोर आलं. त्यांना कोरोना झाला कारण त्यांनी डोस पूर्ण केला नाही अशी माहिती जयंती रवि यांनी दिली होती. क्वारंटाईन झालेल्या लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा उपाय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
CoronaVirus News : धोका वाढला! नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 70 हजार पारhttps://t.co/X1ifsHJJuR#coronavirus#coronaupdatesindia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा
लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारण
CoronaVirus News : "कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचे शोषण नको"
CoronaVirus News : होम क्वारंटाईन कधी संपणार?; आरोग्य मंत्रालयाकडून नियमात मोठा बदल