CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:08 AM2020-05-26T11:08:03+5:302020-05-26T11:14:17+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. डॉक्टर देखील आपल्या घरापासून दूर राहून कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत.

CoronaVirus Marathi News aiims staff died covid 19 never taken leave SSS | CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

Next

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या सव्वा लाखांहून अधिक झाली आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. डॉक्टर देखील आपल्या घरापासून दूर राहून कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत.

कोरोनाच्या लढ्यात अनेक कर्मचारी हे सुट्टी न घेता काम करत आहे. याच दरम्यान एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कोरोना संकटात एकही सुट्टी न घेता अहोरात्र काम केलेल्या एका कोरोना योद्ध्याने आपला प्राण गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. रुग्णालयात सॅनिटायजर सुपरव्हायजर म्हणून काम करणाऱ्या हिरा लाल यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. चाचणी केली असता कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. 

हिरा लाल निर्जंतुकीकरण कर्मचारी, सफाई कामगार आणि वॉर्ड बॉय यांच्यासोबत काम करत होते. त्यांना सफाई कामगार आणि वॉर्ड मुलांबरोबर सतत संपर्कात राहावे लागायचे. यातून त्यांना कोरोनाचं संक्रमण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हिरा लाल यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणं दिसली. एम्स नवी दिल्ली येथील एससी आणि एसटी एसोसिएशनचे सरचिटणीस कुलदीप सिंह यांनी जेव्हा हिरा लाल आजारी पडले तेव्हा लगेचच त्यांनी चाचणी करण्यात आल्याची माहिती दिली आहे. 

'एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना घरी जाऊन विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता आणि लक्षणे वाढल्यास त्यांनी रुग्णालयात परत यावे असे सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला' अशी माहिती कुलदीप सिंह यांनी दिली आहे. तसेच जे लोक या संकटात स्वच्छता आणि इतर महत्त्वाची कामं करत आहेत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी. त्यांना सुरक्षा उपकरणं उपलब्ध करून द्यावीत असंही कुलदीप यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

'पंतप्रधान मोदींच्या आरतीनंतर आता बांधणार मंदिर'; भाजपा आमदाराची घोषणा

धक्कादायक! 100 वॅटचा बल्ब लावला म्हणून घरमालकाने केली भाडेकरूची हत्या

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का

CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?

CoronaVirus News : 'या' तीन कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका

देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान

Web Title: CoronaVirus Marathi News aiims staff died covid 19 never taken leave SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.