CoronaVirus News : मंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध; 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 09:22 AM2020-06-07T09:22:49+5:302020-06-07T10:01:50+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशभरातील मंदिरे व अन्य प्रार्थनास्थळे येत्या आठवड्यापासून दर्शनासाठी खुली करण्यास मुभा मिळणार असली तरी त्याठिकाणी कोणालाही देवाच्या मूर्तीला स्पर्श करू न देण्याचे व भाविकांना तीर्थ-प्रसाद वाटण्यास केंद्र सरकारने बंदी केली आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा या बंद होत्या. गेले अडीच महिने बंद असलेली देशभरातील मंदिरे व अन्य प्रार्थनास्थळे येत्या आठवड्यापासून दर्शनासाठी खुली करण्यास मुभा मिळणार असली तरी त्याठिकाणी कोणालाही देवाच्या मूर्तीला स्पर्श करू न देण्याचे व भाविकांना तीर्थ-प्रसाद वाटण्यास केंद्र सरकारने बंदी केली आहे. सोमवारपासून (8 जून) मंदिरे, प्रार्थनास्थळे, उपाहारगृहे, हॉटेल्स व मॉल पुन्हा सुरू करताना कोणत्या गोष्टींना प्रतिबंध असेल व इतर गोष्टी करताना कोणती काळजी घ्यावी, याच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केल्या आहेत.
सर्व ठिकाणी प्रवेशद्वारापाशी 'हँड सॅनिटायझर' ठेवणे, योग्य अंतर ठेवून लोकांनी रांग कुठे लावावी याच्या खुणा आखणे व ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत अशा व्यक्तींनाच प्रवेश देणे ही बंधने पाळावी लागतील. कोरोनाच्या संकटात व्हायरसचा धोका टाळण्यासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातो. प्रामुख्याने यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर केला जातो. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, मास्क वापरणं, सॅनिटायझरचा वापर करणं या गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. मात्र काही मंदिरातल्या पुजाऱ्यांनी चक्क सॅनिटायझरचा वापर करायला विरोध केला आहे.
भोपाल: #Unlock1 में 8 जून से धार्मिक स्थल खोले जाएंगे।धार्मिक स्थलों के लिए केंद्र सरकार की गाइडलाइन पर भोपाल माँ वैष्णवधाम नव दुर्गा मंदिर के पुजारी ने कहा,'शासन का कार्य है गाइडलाइन जारी करना लेकिन मैं मंदिरों में सैनिटाइज़र मशीन के विरोध में हूं क्योंकि इसमें अल्कोहल होता है। pic.twitter.com/DM5JJcfSEF
— ANI_HindiNews (@AHindinews) June 5, 2020
सॅनिटायझरमध्ये अल्कोहल असल्यामुळे मंदिरात त्याचा वापर केला जाऊ नये अजब दावा काही लोकांनी केला आहे. अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. 'मार्गदर्शक सूचना जारी करणं हे शासनाचं काम आहे. मंदिरात सॅनिटायझर मशीन लावण्यास आमचा विरोध आहे कारण त्यामध्ये अल्कोहल असतं' असं भोपाळमधील एका मंदिराच्या पुजाऱ्याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोना हरणार, देश जिंकणारhttps://t.co/l5wzgrCINg#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#CoronaUpdates#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) June 7, 2020
उद्यापासून देशभरातील मंदिरांचेही प्रवेशद्वार उघडणार
- पादत्राणे वाहनातच काढून ठेवावी.
- आत येण्यापूर्वी प्रत्येकाने हात-पाय धुणे बंधनकारक.
- देवाच्या मूर्तीला स्पर्श करण्यास मनाई.
- तीर्थ-प्रसाद वाटण्यास व पवित्र जल शिंपडण्यास मनाई.
- प्रत्येकाने बसण्यासाठी आपापली सतरंजी अथवा आसन आणावे.
- अनेकांनी एकत्र जमून भजने, आरत्या म्हणण्यास मनाई. त्याऐवजी भक्तिगीतांच्या रेकॉर्ड लावाव्या.
CoronaVirus News : बापरे! रिसर्च आली धक्कादायक माहिती समोरhttps://t.co/MhdI7WSRoJ#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) June 6, 2020
CoronaVirus News : मास्क घालण्याबाबत काय म्हटलंय ते जाणून घ्या https://t.co/9sCz36iwaG#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#CoronaUpdates#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) June 6, 2020