CoronaVirus News : '...म्हणून भारताची भूमिका महत्त्वाची'; मोदींसोबतच्या चर्चेनंतर बिल गेट्स यांचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 12:12 PM2020-05-15T12:12:30+5:302020-05-15T12:17:36+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: पंतप्रधानांनी कोरोनाविरोधात भारताने केलेल्या उपाययोजनांचीही बिल गेट्स यांना माहिती दिली. कोरोनाची ही लढाई सर्वांनी एकत्र मिळून लढली पाहिजे असंही मोदींंनी म्हटलं आहे. चर्चेनंतर बिल गेट्स यांनी एक ट्विट करून पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (14 मे) बिल गेट्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खास चर्चा केली आहे. कोरोनाच्या या लढाईतील समस्या आणि आजाराशी लढण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना यावर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. तसेच पंतप्रधानांनी कोरोनाविरोधात भारताने केलेल्या उपाययोजनांचीही बिल गेट्स यांना माहिती दिली. कोरोनाची ही लढाई सर्वांनी एकत्र मिळून लढली पाहिजे असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या चर्चेनंतर आता बिल गेट्स यांनी एक ट्विट करून पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
बिल गेट्स यांनी कोरोनाच्या संकटामुळे जागतिक स्तरावर पडणारा सामाजिक आणि आर्थिक ताण किमान राहील यासंदर्भात उपाययोजना करताना भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचं म्हटलं आहे. 'कोरोनाच्या संकटामुळे जागतिक स्तरावर निर्माण होणारा सामाजिक आणि आर्थिक ताण किमान राहील यासंदर्भात उपाययोजना करताना भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भारताच्या भूमिकेमुळे लस निर्मिती, चाचणी आणि सर्वांपर्यंत उपचार पोहचण्यासाठीचा मार्ग सुखकर होईल' असं ट्विट बिल गेट्स यांनी केलं आहे.
Thank you for the conversation and partnership, @narendramodi. Combating the pandemic requires global collaboration. India’s role is key as the world works to minimize social and economic impact, and pave the way to vaccine, testing, and treatment access for all. @PMOIndia
— Bill Gates (@BillGates) May 14, 2020
'भारत आपल्या सर्व नागरिकांच्या मदतीने कोरोनाविरोधातील ही लढाई लढत आहे. कोरोनाशी संबंधित सर्व माहिती आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आहोत. याचा लाभ जगभरातील अन्य देशही घेऊ शकतात. अशा कठीण परिस्थितीत कोणतेही पूर्वग्रह न ठेवता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे' असं याआधी मोदींनी बिल गेट्स यांच्यासोबत केलेल्या चर्चेदरम्यान म्हटलं आहे. तसेच 'स्वच्छ भारत अभियानाद्वारे स्वच्छतेबाबत पहिल्यापासूनच जागरूक केलं जात होतं. कोरोनाच्या लढाईत ते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. या लढ्यात गेट्स फाऊंडेशन भारतासोबतच जगभरातील निरनिराळ्या भागांमध्ये मदत पोहोचवत आहे, हे खऱ्या अर्थाने उल्लेखनीय आहे' असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिल गेट्स यांच्याशी खास चर्चा; म्हणाले...https://t.co/E2CR3kG3EF#CoronaUpdatesInIndia#BillGates#NarendraModi
— Lokmat (@MiLOKMAT) May 15, 2020
कोरोनावर मात करुन अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करायची असेल तर काय करायला हवं याबाबत काही दिवसांपूर्वी बिल गेट्स यांनी मोलाचा सल्ला दिला होता. बिल गेट्स यांनी आपल्या ब्लॉगमधून अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याच्या विचारात असणाऱ्या सर्व देशांना काही सल्ले दिले. कोरोनाविरुद्धच्या लढाईची तुलना बिल गेट्स यांनी महायुद्धाशी केली असून या लढाईमध्ये सर्व देश एकाच बाजूने असल्याचं म्हटलं होतं. तसेच कोरोनाच्या चाचण्यांसंदर्भात नव्या पद्धतीने विचार करणे, लस शोधणे आणि सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांच्या जोरावरच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवता येईल असंही त्यांनी नमूद केलं होतं.
CoronaVirus News : नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली, कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांवरhttps://t.co/r4dHLKZlCI#CoronaVirusUpdates#coronavirus#coronavirusinindia
— Lokmat (@MiLOKMAT) May 15, 2020
महत्त्वाच्या बातम्या
प्रेरणादायी! व्याजाने पैसे घेऊन केली UPSC ची तयारी; IAS होऊन शेतकरी पुत्राची नेत्रदीपक भरारी
CoronaVirus News : नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली, कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांवर
CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारण
CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिल गेट्स यांच्याशी खास चर्चा; म्हणाले...
CoronaVirus News : टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक'; 'हे' आहे कारण
CoronaVirus News : भुकेसाठी काय पण! बिस्किटांवरून मजुरांचा स्टेशनवर राडा; Video व्हायरल
CoronaVirus News : 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी!
CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! 1500 भारतीयांवर WHO 'या' औषधांची चाचणी करणार