CoronaVirus News : "राम मंदिर बांधल्यावर कोरोना देशातून पळून जाईल", भाजपा खासदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 08:46 AM2020-07-29T08:46:21+5:302020-07-29T09:01:35+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका महिला खासदाराने एक विधान केलं आहे. 

CoronaVirus Marathi News bjp jaskaur meena says corona will end ram temple built | CoronaVirus News : "राम मंदिर बांधल्यावर कोरोना देशातून पळून जाईल", भाजपा खासदाराचा दावा

CoronaVirus News : "राम मंदिर बांधल्यावर कोरोना देशातून पळून जाईल", भाजपा खासदाराचा दावा

Next

दौसा -  जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटींवर पोहचली असून तब्बल सहा लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्यने 15 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका महिला खासदाराने एक विधान केलं आहे. 

"राम मंदिर उभारल्यावर कोरोना व्हायरस होईल नष्ट" असं खासदाराने म्हटलं आहे. राजस्थानच्या दौसामधील भारतीय जनता पक्षाच्या खासदार जसकौर मीना यांनी हे विधान केलं आहे. "अयोध्येत राम मंदिर तयार झाल्यानंतर देशातील कोरोना व्हायरस आपोआप नष्ट होईल" असं जसकौर मीना म्हणाल्या आहेत. याआधी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने असाच दावा केला होता. अयोध्येत राम मंदिरासाठी (Ram Mandir Ayodhya) भूमिपूजन झालं, मंदिराच्या कामाला सुरुवात झाली की कोरोनाचा शेवट सुरू होईल, असं मध्य प्रदेश विधानसभा उपाध्यक्ष आणि भाजपा नेते रामेश्वर शर्मा यांनी म्हटलं होतं.

"आम्ही अध्यात्मिक शक्तीचे पुजारी आहोत. अध्यात्मिक शक्तीच्या हिशोबानेच चालतो. मंदिर बांधल्यावर कोरोना देशातून पळून जाईल. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. पाच ऑगस्टला आपण सर्व आनंद साजरा करू, घराघरात दिवे लावू, मिठाई वाटू" असं देखील भाजपाच्या खासदार मीना यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अयोध्या: राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी अगदी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत भूमिपूजन होईल. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे.

चांदीची वीट रचून मंदिराची पायाभरणी करण्यात येईल. या विटेचा पहिला फोटो समोर आला आहे. फैजाबादचे भाजपा खासदार लल्लू सिंह यांनी विटेचा फोटो ट्विट केला आहे. ही पवित्र वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रचली जात असताना त्यावेळी मला  तिथे उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. ते मी माझं सौभाग्य समजतो, असं लल्लू सिंह यांनी विटेचा फोटो ट्विट करताना म्हटलं आहे. या विटेचं वजन 22 किलो 600 ग्राम इतकं आहे. 5 ऑगस्टला मोदींच्या चांदीची वीट रचून शिलान्यास करतील. ही चांदीची अयोध्येला पोहोचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'कोणीच लक्ष देत नाही, दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा'; मृत्यूनंतर कोरोनाग्रस्ताचा Video व्हायरल

CoronaVirus News : "कोरोनावरील उपचाराबाबत दोन आठवड्यात देणार 'खूशखबर', करणार मोठी घोषणा"

कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह' 

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना लागण

सप्तपदीनंतर नवरा-नवरी पोहोचले थेट पोलीस ठाण्यात; कारण ऐकून तुम्हीही कराल भरभरून कौतुक

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशाचा रिकव्हरी रेट 64.23%, जगभरात एक कोटी लोकांनी केली कोरोनावर मात

CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा

CoronaVirus News : चिंताजनक! 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ; WHOने बोलावली इमर्जन्सी बैठक

Web Title: CoronaVirus Marathi News bjp jaskaur meena says corona will end ram temple built

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.