CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये मैत्रिणीला लपून-छपून भेटणं भाजपा नेत्याला चांगलंच पडलं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 10:04 AM2020-05-24T10:04:11+5:302020-05-24T10:05:19+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमध्ये लपून छपून भेटणं भाजपाच्या एका नेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. तरीही ते आपल्या मैत्रिणीली भेटण्यासाठी गेले.
चंदीगड - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये 31मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून एक लाखांच्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 3500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र तरीही लोक विनाकारण लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.
लॉकडाऊनमध्ये लपून छपून भेटणं भाजपाच्या एका नेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. तरीही ते आपल्या मैत्रिणीली भेटण्यासाठी गेले. हरियाणाची चंदीगडमध्ये ही घटना घडली. हरियाणा भाजपाचे नेते चंद्रप्रकाश कथुरिया पंचकुलाचे रहिवासी असून लॉकडाऊन दरम्यान आपल्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी दाखल झाले. मात्र याच दरम्यान दारावरची बेल वाजली आणि एकच गोंधळ उडाला. चंद्रप्रकाश यांनी फिल्मी स्टाईलने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न फसला.
मैत्रिणीच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून चादरची दोरी बनवत खाली उतरण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान ते दोन मजल्यांच्या उंचीवरून खाली जमिनीवर कोसळले. यामध्ये चंद्रप्रकाश हे गंभीर जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर कोणीतरी पोलिसांना कंट्रोल रुमला फोन करून इमारतीतून एक जण खाली पडल्याची माहिती दिली होती. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'हे' औषध ठरतंय आशेचा किरणhttps://t.co/yw0nH2NwdV#coronavaccine#CoronavirusCrisis#CoronaVirusUpdates
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2020
CoronaVirus News : 1 जूनपासून धावणार 200 स्पेशल ट्रेन्स; प्रवासाआधी जाणून घ्या नवे नियमhttps://t.co/v7pM53upHt#CoronaUpdatesInIndia#railways
— Lokmat (@MiLOKMAT) May 23, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'हे' औषध ठरतंय आशेचा किरण
बापरे! एक चूक झाली अन् सर्वांना कळले डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स
CoronaVirus News : 1 जूनपासून धावणार 200 स्पेशल ट्रेन्स; प्रवासाआधी जाणून घ्या नवे नियम
"राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक, मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार"
Pakistan Plane Crash : विमान अपघातात 97 ठार, दोघे वाचले; 'ते' भीषण दृश्य CCTV ने टिपले!
CoronaVirus News : तब्बल 18 वर्षांनी 'ते' गावी परतले पण ना आई जिवंत होती ना पत्नी...