CoronaVirus News : योगी सरकारच्या निर्णयावर साक्षी महाराज नाराज; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 02:47 PM2020-05-07T14:47:17+5:302020-05-07T15:51:47+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.

CoronaVirus Marathi News bjp mp sakshi maharaj question over sale liquor lockdown SSS | CoronaVirus News : योगी सरकारच्या निर्णयावर साक्षी महाराज नाराज; म्हणाले...

CoronaVirus News : योगी सरकारच्या निर्णयावर साक्षी महाराज नाराज; म्हणाले...

Next

लखनौ -  कोरोनाचा हाहाकार भारतात सुरूच असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही 50 हजारांच्या पूढे गेली. तीन दिवसांमध्ये 40 हजारांमध्ये 10 हजार रुग्णांची भर पडल्याने पुढच्या काही दिवसांतच भारतात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख सर्वांत वर जाऊन स्थिर होण्याची भीती आरोग्य मंत्रालयास आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारुची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. लॉकडाऊन-3 मध्ये सरकारने दारुची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी दारुची दुकाने सुरू करण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयामुळे साक्षी महाराज नाराज झाले आहेत. 'जनतेचा जीव वाचवण्यासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लॉकडाऊन आहे. मग मद्य, बिडी, सिगारेट, गुटका, पान आदी व्यसनांच्या विक्रीला यातून सूट कशासाठी?' असा सवाल साक्षी महाराज यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट केलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या सत्यदेव पचौरी यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली होती.

सत्यदेव पचौरी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून दारूची दुकाने बंद करा अशी विनंती केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत असल्याने आता आरोग्य यंत्रणा सुधारित स्ट्रॅटेजीवर विचार करीत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे. तर ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ATMमधून पैसे काढायला घाबरता?, मग 'या' दुकानातून काढू शकता रक्कम

CoronaVirus News : 'कोरोना व्हायरसचा प्रसार वुहानच्या प्रयोगशाळेतून झाला'; अमेरिका ठाम

 

Web Title: CoronaVirus Marathi News bjp mp sakshi maharaj question over sale liquor lockdown SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.