कौतुकास्पद! कोरोनावर मात केल्यानंतर चक्क उद्योगपतीने ऑफिसला बनवलं रुग्णालय, मोफत देतोय उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 12:00 PM2020-07-22T12:00:09+5:302020-07-22T12:18:40+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा धोका वाढत असला तरी अनेक जण कोरोनाच्या लढाईत मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News businessman make office covid hospital for people | कौतुकास्पद! कोरोनावर मात केल्यानंतर चक्क उद्योगपतीने ऑफिसला बनवलं रुग्णालय, मोफत देतोय उपचार

कौतुकास्पद! कोरोनावर मात केल्यानंतर चक्क उद्योगपतीने ऑफिसला बनवलं रुग्णालय, मोफत देतोय उपचार

Next

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर होत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 11,92,915 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 37,724  नवे रुग्ण आहेत तर 648 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 28,732 लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचा धोका वाढत असला तरी अनेक जण कोरोनाच्या लढाईत मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. 

गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान एका उद्योगपतीने गरीब रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर उद्योगपतीने आपल्या ऑफिसचं रुपांतर हे रुग्णालयात केलं असून तिथे रुग्णांवर मोफत उपचार होणार आहेत. कादर शेख असं सूरतमध्ये राहणाऱ्या उद्योगपतीचं नाव असून त्यांनी कोरोना रुग्णासाठी रुग्णालय उभारलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कादर शेख यांना कोरोनाची लागण झाली होती. एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शेख यांनी कोरोनाची लढाई जिंकली असून कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मात्र त्यांच्या उपचारावरचा खर्च हा खूपच जास्त होता. त्याचवेळी गरीब लोक हा खर्च कसा करतील असा प्रश्न त्यांना पडला आणि म्हणूनच त्यांनी गरीबांसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या ऑफिसची जागा ही कोरोना रुग्णालय तयार करण्यासाठी दिली आहे. 

शेख यांनी सूरतच्या श्रेयम कॉम्प्लेक्समध्ये असलेलं 30 हजार स्क्वेअर फिटचं ऑफिस कोरोना रुग्णालयासाठी दिलं आहे. यामध्ये 85 बेड असून कोरोनाग्रस्तांना अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. शेख यांच्या निर्णयाचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दिवसागणिक त्याचा धोका हा सातत्याने वाढत आहे. जगभरात आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्ब्ल सहा लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावावा लागला आहे तर अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाचा फटका! नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

CoronaVirus News : हवेतूनही होतो कोरोनाचा प्रसार; मास्कबाबत तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...

पावसाचे थैमान! आठ राज्यांत तब्बल 470 जणांचा मृत्यू

...म्हणून दर 6 महिन्यांनी होणार आता सिमकार्ड व्हेरिफिकेशन, जाणून घ्या नवा नियम

CoronaVirus News : भारीच! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने कोरोनाला असं लावलं पळवून

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाग्रस्तांसाठी 'हे' औषध ठरतंय संजीवनी; 79 टक्के धोका झाला कमी

Web Title: CoronaVirus Marathi News businessman make office covid hospital for people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.