CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये गावकऱ्यांनी काढली गायीची अंत्ययात्रा अन् नंतर झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 12:32 PM2020-05-24T12:32:42+5:302020-05-24T12:47:31+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र अनेक ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे.
अलीगड - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 31 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून सव्वा लाखांच्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र अनेक ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच एक अलीगडमधील धक्कादायक घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये गायीच्या अंत्यसंस्कारासाठी लॉकडाऊनमध्ये लोकांनी मोठया संख्येने गर्दी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जवा येथील गावकऱ्यांनी गायीची अंत्ययात्रा काढून सोशल डिस्टसिंग आणि जमावबंदीच्या कायद्याचं उल्लंघन केलं. या प्रकरणी पोलिसांनी 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात जवळपास 100 महिला आणि 50 पुरुषांचा समावेश आहे. मैमडी येथील दिनेश चंद्र शर्मा यांच्या गायीचा मृत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी गायीची अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला.
CoronaVirus News : बापरे! आईच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पास मिळवला, रेड झोनमध्ये गेला अन्... https://t.co/WB3Pz9zbn1#CoronaUpdatesInIndia#coronavirusinindia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2020
अंत्ययात्रेत गावातील महिलांची संख्या जास्त असल्याची माहिती मिळत आहे. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांनी चेहऱ्यावर मास्क देखील लावले नव्हते. गावातील गायीच्या अंत्ययात्रेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जवळपास 150 लोक यामध्ये सहभागी झाल्याने सोशल डिस्टसिंगचाही फज्जा उडाला. पोलिसांना या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच ते तातडीने दाखल झाले आणि त्यांनी योग्य ती कारवाई केली आहे. तब्बल 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'हे' औषध ठरतंय आशेचा किरणhttps://t.co/yw0nH2NwdV#coronavaccine#CoronavirusCrisis#CoronaVirusUpdates
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2020
काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या मदुराईमध्ये बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मदुराईतील एका बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक उपस्थित होते. याप्रकरणी लॉकडाऊनचे उल्लंघन केलेल्या तब्बल 3 हजार लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी प्रचंड गर्दी जमली होती. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3 हजार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.
CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णयhttps://t.co/i5Ht63iH0u#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#mobile
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! आईच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पास मिळवला, रेड झोनमध्ये गेला अन्...
CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : धोका वाढला! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंताजनक आकडेवारी
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये मैत्रिणीला लपून-छपून भेटणं भाजपा नेत्याला चांगलंच पडलं महागात
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'हे' औषध ठरतंय आशेचा किरण
बापरे! एक चूक झाली अन् सर्वांना कळले डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स