CoronaVirus News : जूनमध्ये 'या' दिवशी कोरोना व्हायरस होणार नष्ट?; शास्त्रज्ञाचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 02:36 PM2020-06-15T14:36:01+5:302020-06-15T14:48:40+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर अद्याप कोणतंही औषध अथवा लस उपलब्ध झालेलं नाही. जगभरात त्यासाठी संशोधन करण्यात येत आहे. अशातच कोरोनासंदर्भात अनेक दावे देखील करण्यात येत आहे.

CoronaVirus Marathi News chennai scientist claims corona cured solar eclipse | CoronaVirus News : जूनमध्ये 'या' दिवशी कोरोना व्हायरस होणार नष्ट?; शास्त्रज्ञाचा अजब दावा

CoronaVirus News : जूनमध्ये 'या' दिवशी कोरोना व्हायरस होणार नष्ट?; शास्त्रज्ञाचा अजब दावा

Next

चेन्नई - देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल तीन लाखांवर पोहोचली असून 9 हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर अद्याप कोणतंही औषध अथवा लस उपलब्ध झालेलं नाही. जगभरात त्यासाठी संशोधन करण्यात येत आहे. अशातच कोरोनासंदर्भात अनेक दावे देखील करण्यात येत आहे. याच दरम्यान 21 जून रोजी कोरोना व्हायरस नष्ट होईल असा अजब दावा करण्यात आला आहे. चेन्नईतील एका शास्त्रज्ञाने सूर्यग्रहण आणि कोरोना व्हायरस याचा संबंध असल्याचा दावा केला आहे. 

सूर्यग्रहणामुळे कोरोना नष्ट होऊ शकतो असा अजब दावा करण्यात आला आहे. अणू आणि पृथ्वी वैज्ञानिक डॉ. केएल सुंदर कृष्णा यांनी हा दावा केला आहे. केएल सुंदर यांनी गेल्या वर्षी 26 डिसेंबर रोजीचं सूर्यग्रहण आणि कोरोना व्हायरस यांचा संबंध असल्याचं म्हटलं आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. 26 डिसेंबरच्या या ग्रहणाने सूर्यमालेत ग्रहांची संरचना बदलली आहे. त्यामुळेच 21 जून रोजी कोरोना व्हायरस नष्ट होईल असं केएल सुंदर कृष्णा यांनी म्हटलं आहे. 

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चीनमध्ये हा बदल सर्वप्रथम पाहिला गेला. हा बदल एखाद्या प्रयोगामुळे किंवा हेतूपुरस्सर प्रयत्नांचा परिणाम आहे. त्यामुळे येत्या सूर्यग्रहण एक टर्निंग पॉईंट असल्याचं सिद्ध होऊ शकतं असा विश्वास आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे लोकांना यावर घाबरून जाण्याची गरज नाही'. रविवारी 21 जून रोजी सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. सूर्यग्रहण सकाळी 10 वाजून 1 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 28 मिनिटांपर्यंत दिसणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 78 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील अनेक देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या बाजारात विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. मात्र आता मास्क हसणारा आणि बोलणारा मास्क आला आहे. अमेरिकेतील गेम डिझायनर आणि प्रोग्रामर टेलर ग्लेयल यांनी हटके मास्क तयार केला आहे. कोरोनापासून वाचवणारा LED मास्क तयार करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : तुम्ही हसलात की 'तो' ही हसणार; कोरोनापासून वाचवणारा हटके LED मास्क पाहिलात का?

Sushant Singh Rajput Suicide : "आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, न्यायालयीन चौकशी केली जावी"

CoronaVirus News : कोरोना संशयित रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबत महत्त्वाची माहिती; आरोग्य मंत्रालयाचे नवे नियम

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतचे 'ते' फोटो पोस्ट करत असाल, तर....; सायबर सेलचा कडक इशारा

Sushant Singh Rajput Suicide: "सुशांत आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे"

CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

Web Title: CoronaVirus Marathi News chennai scientist claims corona cured solar eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.