CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा दिसताहेत लक्षणं, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 10:11 AM2020-08-19T10:11:15+5:302020-08-19T10:13:43+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 64,531 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1092 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 27 लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 52,889 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 64,531 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1092 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील रुग्णांचा आकडा 27,67,274 वर पोहोचला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.
कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा लक्षणं दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांना आरोग्यासंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिल्ली सरकारच्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये कोविड-19 क्लिनिक सुरू होत आहे. यामध्ये कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुन्हा लक्षणं आढळल्यास त्याचं विश्लेषण केलं जाणार आहे. देशात सध्या कोरोनाचा कहर आहे.
CoronaVirus News : मास्क लावण्याचा कंटाळा येतो? मग 'हा' Video नक्की पाहाhttps://t.co/brzk4iMWHW#coronavirus#CoronaUpdates#COVID19#mask
— Lokmat (@MiLOKMAT) August 19, 2020
रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. बी.एल. शेरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी याचा अर्थ अनेकांना पुन्हा त्रास जाणवू लागला आहे. कोरोनातून लोक बरे होत आहेत. मात्र त्यानंतर देखील आता रुग्णांना श्वासोच्छवासाच्या तक्रारी आल्या आहेत. आम्हाला यासंदर्भात रूग्णांकडून बरेच फोनही आले आहेत. म्हणूनच पोस्ट कोविड-19 क्लिनिक सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.
CoronaVirus News : आपलेही परके होतात तेव्हा...; मन सुन्न करणारी घटनाhttps://t.co/3sfUgPPzxI#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) August 18, 2020
डॉ. बी. एल. शेरवाल यांनी 'आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णाला श्वासोच्छवासाची समस्या असते. दुसर्या रुग्णाला खोकल्याचा त्रास होतो. त्याच वेळी, काही रुग्ण फुफ्फुसाचा आजार झाला. हे रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत' असं म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटात कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवू लागला तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स करताहेत अहोरात्र काम, तुम्हीही कराल भरभरून कौतुकhttps://t.co/nHcQL0Nsgi#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#doctors#coronawarrior
— Lokmat (@MiLOKMAT) August 18, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"...तर पंजाब पेटून उठेल", मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा
CoronaVirus News : तंत्रज्ञानाची कमाल! आता चेहऱ्यावर मशीन लावणार मास्क, Video तुफान व्हायरल
"काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल"
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास मुलाने दिला नकार, शेवटी...
धक्कादायक! तब्बल 4 महिने आईच्या मृतदेहाजवळ बसून होती मुलगी