CoronaVirus News : भारीच! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने कोरोनाला असं लावलं पळवून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 12:09 PM2020-07-21T12:09:10+5:302020-07-21T12:39:54+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येने 11 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

CoronaVirus Marathi News corona cases in delhi now below 1000 after 49 days | CoronaVirus News : भारीच! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने कोरोनाला असं लावलं पळवून

CoronaVirus News : भारीच! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने कोरोनाला असं लावलं पळवून

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येने 11 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी दररोज नव्या बाधित रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, सोमवारी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली असून, दिवसभरात तब्बल 587 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येने 28 हजारांचा आकडा ओलांडला आहे. मात्र दुसरीकडे कोरोनावर मात केलेल्यांची संख्या वाढत आहे. अनेक दिलासादायक घटना समोर येत आहेत.

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या दिल्लीने कमी दिवसांत कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळे दिल्लीतून आता आनंदाची बातमी समोर येत आहे. कोरोनवर नियंत्रण मिळवण्यात दिल्लीमध्ये यश येत असून रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच मृत्यूदर देखील कमी झाल्याची  माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. मात्र आता परिस्थिती सुधारत आहे. खबरदारीचे योग्य उपाय केले जात असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश येत आहे.

दिल्लीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही  एक लाख 23 हजारांवर आहे. मात्र आता केवळ 15 हजार अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहे. रुग्णांचे बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असलेलं दिल्ली हे देशातील एकमेव राज्य आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. तेव्हा दिवसाला जवळपास पाच ते सहा हजार लोकांची कोरोना चाचणी केली जात होती. मात्र आता हे वाढवण्यात आलं आहे. कोरोना चाचण्यांची संख्या ही चार पटीने वाढवण्यात आली आहे. रॅपिड अँटिजन किटचा देखील वापर केला जात आहे. सध्या दिल्लीत दररोज 21 ते 23 हजार चाचण्या केल्या जातात.

दिल्लीतील रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 84 टक्क्यांहून जास्त असल्याची माहिती मिळत आहे. देशामध्ये रिकव्हरी रेटमध्ये दिल्ली सर्वात पुढे आहे. कोरोनाग्रस्तांसाठी प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीतील कोविड रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली आहे. याचा रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचा धोका वाढत असताना फक्त 700 बेड हे कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध होते. मात्र आता त्याची संख्या वाढवण्यात आली असून रुग्णालयात अधिक बेड्स उपलब्ध आहेत. दिल्लीतील विविध रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाग्रस्तांसाठी 'हे' औषध ठरतंय संजीवनी; 79 टक्के धोका झाला कमी

CoronaVirus News : अरे व्वा! कोविड सेंटरमध्येच रुग्णांनी केला भन्नाट डान्स, Video तुफान व्हायरल

CoronaVirus News : आजारी आईला पाहण्यासाठी 'तो' रुग्णालयाच्या इमारतीवर चढायचा अन्...; मन सुन्न करणारी घटना

धक्कादायक! ...म्हणून चिमुकल्यावर आली आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ

"पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती"

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना रुग्णालयात डुक्करांचा मुक्त संचार; Video जोरदार व्हायरल

CoronaVirus News : चिंता वाढली! 'या' वयोगटातील मुलांपासून आहे कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून मोठा खुलासा

Web Title: CoronaVirus Marathi News corona cases in delhi now below 1000 after 49 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.