CoronaVirus News : कोरोनाचा धसका! मृतदेहाला खांदा देण्यासाठी कोणीच नाही तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 07:22 PM2020-04-30T19:22:25+5:302020-04-30T19:38:35+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: एका महिलेचा मृत्यू झाला. तीन व्यक्ती खांदेकरी म्हणून पुढे आले मात्र चौथ्या व्यक्तीने मृतदेहाला खांदा देण्यासाठी पैशांची मागणी केली आहे.
नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33 हजार 610 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1075 जणांचा मृत्यू झाला आहे. 24162 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 8373 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. कोरोनामुळे लोकांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
लॉकडाऊनमध्ये लोकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र याच दरम्यान मृत्यू झाल्यास कोरोनाच्या भीतीने मृतदेहाला खांदा देण्यासाठी कोणीच तयार नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. तीन व्यक्ती खांदेकरी म्हणून पुढे आले मात्र चौथ्या व्यक्तीने मृतदेहाला खांदा देण्यासाठी पैशांची मागणी केली आहे. दिल्लीतील कृष्णा नगर भागात ही घटना घडली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : चिंताजनक! गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वरhttps://t.co/eAEuOeBIg6#CoronaUpdatesInIndia#COVID2019india
— Lokmat (@MiLOKMAT) April 30, 2020
मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून महिला आजारी होती. मंगळवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. या कुटुंबात मुलगा आणि दोन मुली आहेत. मुलाने महिलेचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणला. मात्र अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जाण्यासाठी कोणीही तयार झाले नाही. ही गोष्ट समजल्यानंतर एका संघटनेशी निगडीत काही लोक स्मशानभूमीत उपस्थित झाले. मृतदेह उचलण्याची वेळ आली तेव्हा नातेवाईक हात लावायला तयार झाले नाहीत. महिलेचा मुलगा आणि संघटनेची दोन माणसं मिळून तीन जण झाले त्यानंतर एका व्यक्तीलाच मृतदेहाला खांदा देण्याची विनंती करण्यात आली.
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये जोडप्याने लढवली शक्कल, बाहुलीला बनवलं आजारी बाळ अन्https://t.co/c3gvetqIbQ#CoronaUpdatesInIndia#coronalockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 30, 2020
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33 हजार 610 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1075 जणांचा मृत्यू झाला आहे. 24162 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 8373 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (30 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 67 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 1823 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत.
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, 'ही' सेवा होऊ शकते बंदhttps://t.co/67xi2lGdpF#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown#Metro
— Lokmat (@MiLOKMAT) April 30, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : चिंताजनक! गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वर
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये जोडप्याने लढवली शक्कल, बाहुलीला बनवलं आजारी बाळ अन्
CoronaVirus News : धक्कादायक! पत्नीला कोरोना झाल्यामुळे पतीची आत्महत्या
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, 'ही' सेवा होऊ शकते बंद
CoronaVirus News : "...तर कोरोनाऐवजी लॉकडाऊनमुळे जास्त लोकांचा मृत्यू होईल"