CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 03:06 PM2020-07-23T15:06:55+5:302020-07-23T15:33:41+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - कोरोनाचा जगभरात हाहाकार पाहायला मिळत आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून तब्बल अकरा लाखांचा टप्पा आता पार केला आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत.
डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या डॉक्टरचामृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन खासगी रुग्णालयांनी उपचारासाठी नकार दिल्याने डॉक्टरना आपला जीव गमवावा लागला आहे. मंजूनाथ असं डॉक्टरचं नाव असून ते कोरोनाग्रस्तांवर उपचार करत होते.
CoronaVirus News : कोरोना वॅक्सीनवर WHO च्या तज्ज्ञांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...https://t.co/Hi15SbuwM1#coronavirus#CoronaUpdates#WHO#CoronavirusVaccine
— Lokmat (@MiLOKMAT) July 23, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. मंजुनाथ हे रामनगर जिल्ह्यातील एका प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये काम करत होते. यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना ताप येऊ लागला. 25 जूनला ताप आणि श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यानंतर कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मंजूनाथ यांच्यावर कोरोनावरील उपचार करण्यासाठी तीन खासगी रुग्णालयांनी नकार दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : उद्योगपतीने ऑफिसचं रुपांतर रुग्णालयात करण्यामागे 'हे' आहे कारणhttps://t.co/V7QH0O9ClM#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 22, 2020
मंजूनाथ यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने अखेर त्यांना बंगळुरूमधील मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या कुटुंबातील आणखीन 6 सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही डॉक्टर असून सुद्धा आम्हाला अशा प्रसंगांचा सामना करावा लागत असल्याचं डॉ. मंजुनाथ यांच्या भावाने म्हटलं आहे.
लय भारी! तुफान व्हायरल होणारा 'हा' भन्नाट व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल पत्रकाराचं भरभरून कौतुकhttps://t.co/oPWSZK930j#coronavirus#CoronaUpdates#Mask#SocialMedia#Video
— Lokmat (@MiLOKMAT) July 22, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात
चिंता वाढली! कोरोना पाठोपाठ देशावर येतंय आणखी एक मोठं संकट
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी
CoronaVirus News : भयंकर! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पेटवून दिली रुग्णवाहिका
CoronaVirus News : कोरोना वॅक्सीन नेमकी कधी उपलब्ध होणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती