CoronaVirus News : आपलेही झाले परके! रुग्णवाहिकेत 24 तास पडून होता कोरोनाग्रस्ताचा मृतदेह, शेवटी...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 03:33 PM2020-07-30T15:33:09+5:302020-07-30T15:41:43+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून धोका वाढला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 15 लाखांवर गेली आहे. तर आतापर्यत 33 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोरोनाच्या भीतीने कुटुंबियांनी रस्त्यावरच आपल्या कुटुंबातील एका सदस्याचा मृतदेह सोडून दिल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यानंतर आता कोरोनाच्या भीतीने काहींनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. बिहारच्या कटिहारमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला पण त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 24 तास रुग्णवाहिकेत पडून होता.
CoronaVirus News : कोरोनासंदर्भात अनेक गोष्टी सर्च करता?, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या 'डूम स्क्रोलिंग' म्हणजे नेमकं काय? https://t.co/PysUPwDd4Q#coronavirus#CoronaUpdates#COVID19India#health
— Lokmat (@MiLOKMAT) July 30, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, कहिटारमध्ये एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याचवेळी पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र त्याच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने मृतदेह कित्येक तास रुग्णवाहिकेतच पडून होता. शेवटी प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : बापरे! 'तो' धक्कादायक Video शेअर करून रुग्णाने सोडला जीव https://t.co/vuu0ZMdv0C#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 28, 2020
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 15,83,792 वर गेला आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 52,123 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 34,968 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे जगभरात देखील कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे.
CoronaVirus News : कोरोनाची लढाई जिंकली पण...; नव्या रिसर्चने चिंता वाढवली https://t.co/NnAc3ZOObh#coronavirus#CoronaUpdates#COVID19#Health
— Lokmat (@MiLOKMAT) July 30, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : ...अन् पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी स्वतः घेतलं स्टेअरिंग हातात
CoronaVirus News : बापरे! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय 'हा' आजार; वेळीच व्हा सावध
मुंबईचा वाघ! राणीच्या बागेतून थेट 'शक्ती' प्रदर्शन
WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात?; आता कायमस्वरूपी Mute करून टाका!
CoronaVirus News : बाबो! क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं तब्बल 50 लाख
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई