CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोना हरणार, देश जिंकणार; 'ही' तीन औषधं व्हायरसला टक्कर देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 05:10 PM2020-06-22T17:10:11+5:302020-06-22T17:23:00+5:30

CoronaVirus News : कोरोनावर अद्याप कोणतीही लस  किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही. यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र याच दरम्यान अनेक दिलासादायक घटना समोर येत आहेत.

CoronaVirus Marathi News corona new treatment medicines remdesivir favipiravir | CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोना हरणार, देश जिंकणार; 'ही' तीन औषधं व्हायरसला टक्कर देणार

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोना हरणार, देश जिंकणार; 'ही' तीन औषधं व्हायरसला टक्कर देणार

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही तब्बल 90 लाखांच्या वर गेली आहे. तर चार लाख 70 हजार लोकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत 14821 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 4,25,282 वर पोहोचली आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस  किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही. यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र याच दरम्यान अनेक दिलासादायक घटना समोर येत आहेत. 

कोरोनाच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. देशातील औषध तयार करणाऱ्या कंपन्यांना दोन औषधांचे तीन जेनेरिक व्हर्जन काढण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाली आहे. यात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) रेमडेसिव्हर (Remdesivir) आणि फेवीपिरवीर (Favipiravir) औषधांची निर्मिती करणार आहे. अनेक ठिकाणी त्याची क्लिनिकल चाचणी झाली असून परिणाम चांगले आले आहेत. रुग्णांवर ते प्रभावी ठरत असल्याची माहिती मिळत आहे. 

अँटीवायरल ड्रग फेवीपिरवीर  मुंबईच्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने (Glenmark Pharmaceuticals) तयार केले आहे. हे इन्फ्लूएन्झाच्या उपचारांसाठी जपानमध्ये आधीच वापरले जाते. कोविड-19 वर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. ग्लेनमार्कच्या मते, कोरोना रूग्णांच्या उपचारात 88 टक्के रुग्णांना या औषधाचा फायदा झाला. चार दिवसातच व्हायरल लोड, म्हणजेच शरीरातील विषाणूंची संख्या कमी झाल्याची दिलासादायक माहिती मिळत आहे.

ग्लेनमार्क या कंपनीने 20 जून रोजी पत्रकार परिषदेत औषध संदर्भात चार क्लिनिकल चाचण्यांची माहिती दिली. त्यापैकी 2 चाचण्या चीनमध्ये, एक रशियामध्ये आणि एक जपानमध्ये आहे. चीनमधील एका अभ्यासात 80 रूग्ण घेण्यात आले, त्यांच्या परिणामांचा अभ्यास केला गेला. Lopinavir सारखी इतर औषधे देखील एका ग्रुपला दिली गेली. तुलनात्मक अभ्यासात, हे स्पष्ट झाले की ज्या रुग्णांना फॅबिफ्लू देण्यात येत होते त्यांच्यात व्हायरल लोड कमी झाला. यामुळे रुग्ण लवकर बरा झाला. चीनच्या दुसऱ्या एका अभ्यासात 236 रुग्णांचा सहभाग होता. यामध्येही औषधानं चांगला परिणाम दाखवला. या औषधास फॅबिफ्लू (FabiFlu ) असं ब्रँड नाव दिलं गेलं आहे. जे टॅबलेट स्वरूपात दिले जाईल. फॅबिफ्लू फक्त कोरोनाची सौम्य आणि सरासरी लक्षणे असलेल्या रूग्णांवरच वापरली जाईल असा निर्णय देखील घेण्यात आला आहे. 

कोरोन व्हायररसचं संक्रमण रोखण्यासाठी आणखी एक औषध निर्माण करणार कंपनी कोविफोर हे दुसरं औषध लाँच करणार आहे.  हे रेमडेसिवीरचं जेनेरिक व्हर्जन असणार आहे. 2014 मध्ये इबोलावरील उपचारासाठी हे औषध वापरण्यात आलं होतं. कोविफोर हे औषध इंट्रावेनस  पद्धतीने म्हणजेच नसेमध्ये दिलं जातं. जवळपास या औषधासाठी 5000 ते 6000 चा खर्च येतो. यानुसार पाच दिवसांसाठी तीस हजार खर्च येऊल अशी माहिती कंपनीने दिली आहे. 

कोरोना विरोधातील लढाईतील तिसरं औषध सिप्रमी आहे. हे देखील रेमडेसिवीर प्रमाणेच आहे. सिप्ला ही कंपनी यावर काम करत आहे. सध्या कंपनीने त्याच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. ही औषधे कोरोना व्हायरसवर खात्रीशीर उपाय नसल्यामुळे, त्यांचा वापर विशेष मार्गाने आणि काही बाबतीत केला जाणार. DCGIच्या मते रेमडेसिवीर औषध फक्त restricted emergency use सुरक्षित असणार आहे. म्हणजेच जर रुग्णाला या औषधाबद्दल संपूर्ण माहिती दिली गेली आणि त्यानंतर जर त्याने त्यांच्यावर उपचार करण्यास सहमती दर्शविली तरच रुग्णावर हे औषध वापरलं जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

India China Faceoff : भारताला लुबाडण्यासाठी चीनची 'नवी चाल'; 'या' आवश्यक वस्तूंचे वाढणार भाव 

ही दोस्ती तुटायची नाय! मधमाश्यांचा भन्नाट मित्र पाहिलात का?; Video पाहून हैराण व्हाल 

'काँग्रेसच्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली, मेंदूला सूज आली', भाजपा खासदाराचा गंभीर आरोप

चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी

"चीनी वस्तूंचा वापर करणाऱ्यांचे पाय तोडा, घरांचं नुकसान करा"

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! तब्बल 81 देशांमध्ये दुसरी लाट; WHO ने दिला गंभीर इशारा

मोदी सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत 1000 रुपये भाड्याने मिळणार घर; जाणून घ्या कोणाला, कसा होणार फायदा

 

Web Title: CoronaVirus Marathi News corona new treatment medicines remdesivir favipiravir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.