भय इथले संपत नाही! कोरोनामुळे रुग्णाचं फुफ्फुस झालं "लेदर बॉल"सारखं, धडकी भरवणारी केस 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 01:33 PM2020-10-24T13:33:39+5:302020-10-24T13:38:20+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसचा शरिरावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. अशीच एक चिंता वाढवणारी केस आता समोर आली आहे. 

CoronaVirus Marathi News corona patient lungs found hard as leather ball | भय इथले संपत नाही! कोरोनामुळे रुग्णाचं फुफ्फुस झालं "लेदर बॉल"सारखं, धडकी भरवणारी केस 

भय इथले संपत नाही! कोरोनामुळे रुग्णाचं फुफ्फुस झालं "लेदर बॉल"सारखं, धडकी भरवणारी केस 

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 78,14,682 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 53,370 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 650 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,17,956 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाबाबत संशोधन सुरू असून संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती आता समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शरिरावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. अशीच एक चिंता वाढवणारी केस आता समोर आली आहे. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका रुग्णाचं फुफ्फुस लेदर बॉलसारखं टणक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शवविच्छेदनातून ही माहिती समोर आली असून चिंता वाढली आहे. कर्नाटकमधील एका रुग्णाचे शवविच्छेदन केल्यानंतर हे आढळून आलं आहे. कोरोना व्हायरस माणसाच्या शरिरातील विविध अवयवांवर हल्ला करतं. प्रामुख्याने फुफ्फुसावर हल्ला केला जातो. कोरोनामुळे रुग्णाच्या फुफ्फुसाची किती भयंकर अवस्था होते हे कर्नाटकमधील रुग्णाच्या शवविच्छेदनानंतर दिसून आलं आहे.

रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर 18 तासांनंतरही त्याच्या नाक व घशात कोरोनाचा व्हायरस जिवंत

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, एका 62 वर्षांच्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शवविच्छेदनात रुग्णाचं फुफ्फुस लेदर बॉलसारखं टणक झाल्याचं दिसून आलं. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर 18 तासांनंतरही त्याच्या नाक व घशात कोरोनाचा जिवंत व्हायरस आढळून आले. रुग्णाच्या मृत्यूनंतरही मृतदेहाच्या संपर्कात आल्यास कोरोना होऊ शकतो ही माहितीही समोर आली आहे. कोरोनाच्या केसमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 

कोरोनाचा विळखा! शवविच्छेदनातून समोर आलेल्या माहितीने वाढवली चिंता 

ऑक्सफर्ड वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर दिनेश राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "रुग्णांचं फुफ्फुस कोरोनाच्या संक्रमणामुळे एखाद्या लेदर बॉलसारखे झाले होते. फुफ्फुसात हवा भरणारा भाग पूर्णपणे खराब झालेला होता. तर वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या होत्या. मृतदेहाच्या तपासणीमुळे कोरोनाची नवी अवस्था समजून घेण्यास मदत मिळाली आहे." राव यांनी मृतदेहाच्या नाक, घसा, तोंड, फुफ्फुसाचा पृष्ठभाग, चेहरा व गळ्याच्या त्वचा अशा पाच ठिकाणचे नमुने घेतले होते. आरटीपीसीआर चाचणीनंतर घशात आणि नाकात कोरोना व्हायरस आढळून आला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: CoronaVirus Marathi News corona patient lungs found hard as leather ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.