CoronaVirus News : काय सांगता? संगीत ऐकून कोरोनाग्रस्त बरे होणार; 'ही' थेरेपी फायदेशीर ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 09:26 AM2020-05-20T09:26:02+5:302020-05-20T09:35:20+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या थेरेपीचा वापर हा आवर्जून केला जात आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना काही दिलासादायक घटना समोर येत आहेत.
मेरठ - देश कोरोनाचा सामना करत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल एक लाखांवर गेला आहे. तर तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस आणि औषध उपलब्ध नाही याच दरम्यान एक सकारात्मक घटना समोर आली आहे.
देशातील विविध रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या थेरेपीचा वापर हा आवर्जून केला जात आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना काही दिलासादायक घटना समोर येत आहेत. संगीत ऐकून कोरोना रुग्ण बरे होत असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एका रुग्णालयात कोरोना रुग्णांवर औषधांनी उपचार करण्यासोबतच त्यांना म्युझिक थेरेपी दिली जात आहे. या रुग्णांना गाणी ऐकवली जात आहे आणि यामुळेच रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला निर्णयhttps://t.co/jdjonMd8UN#Coronavirus#Masks
— Lokmat (@MiLOKMAT) May 20, 2020
रुग्णालयात कोविड-19 चे रुग्ण असलेल्या विभागात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक (Instrumental Music) सुरू असतं. यामुळे कोरोना रुग्ण हे आधीपेक्षा खूप जास्त आनंदी आहेत. मेडिकल कॉलेज रुग्णालयातील रुग्णांची मानसिक आरोग्य ठेवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच दिवसातून तीन वेळा कोविड वॉर्डमध्ये हळू आवाजात संगीत लावलं जातं. ज्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये उत्साह येतो असं देखील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.
कोविड वॉर्डचे प्रभारी डॉक्टर सुधीर राठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्युझिक थेरेपी कोरोनाग्रस्तांना बरे करण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. कारण यामुळे रुग्णांचा आत्मविश्वास वाढतो. लखनऊतील डॉक्टर वेदप्रकाश यांच्या सल्ल्यानुसार कोविड वॉर्डमध्ये आणखी काही सकारात्मक पावलं उचलण्यात आली आहेत ज्याची स्तूती रुग्णांनीही केली आहे. डॉक्टर्सच्या मते हळू आवाजात संगीत लावल्याने रुग्णांचं फक्त मनोरंजनच होत नाही तर त्यांच्या प्रकृतीतवरही सकारात्मक परिणाम दिसून येतो आहे.
CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊननंतर चिमुकल्यांची होईल भयानक अवस्था?; नोबेल विजेते म्हणतात...https://t.co/jkcEsiL0M7#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown#Children
— Lokmat (@MiLOKMAT) May 19, 2020
काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसचे रुग्ण हे मेरठमधील रुग्णालयात डान्स करताना दिसून आले. याच रुग्णालयातील 85 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेनेही कोरोनावर मात केली आहे. येथील रुग्णांचा आत्मविश्वास वाढला आहे. कित्येक रुग्ण गाण्यावर डान्स करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेरठमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 341 झाला आहे. तर 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 146 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Lockdown 4.0 : प्रवासासाठी ई-पास काढायचाय?; धावाधाव नको, केंद्राची 'ही' वेबसाईट करेल मदतhttps://t.co/yMYuNQZ1eg#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown#Travel#epass
— Lokmat (@MiLOKMAT) May 19, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊननंतर चिमुकल्यांची होईल भयानक अवस्था?; नोबेल विजेते म्हणतात...
CoronaVirus News : "सरकारचा 'हा' निर्णय दिल्लीकरांसाठी डेट वॉरंट ठरू शकतो"
Lockdown 4.0 : प्रवासासाठी ई-पास काढायचाय?; धावाधाव नको, केंद्राची 'ही' वेबसाईट करेल मदत
CoronaVirus : फक्त 12 दिवसांत देशातील रुग्णांची संख्या दुप्पट; कोरोनाचा धक्कादायक ग्राफ
CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात ICMRने रणनीतीत केले मोठे बदल; आता 'या' लोकांचीही होणार चाचणी