CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:17 AM2020-05-24T11:17:18+5:302020-05-24T11:23:41+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 6767 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत तर 147 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे.
नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 6767 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत तर 147 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक लाख तीस हजारांच्यावर पोहोचली आहे. याच दरम्यान कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. एका राज्याने हा मोठा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेश सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये फोनचा वापर करता येणार नाही. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी फोनवर बंद घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेशचे डीजी मेडिकल केके गुप्ता यांनी रुग्णांवर मोबाईल बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संबंधित अधिकाऱ्यांना पत्रही पाठवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे महासंचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण) यांनी दिलेल्या आदेशानंतर राज्यातील कोविड-19 रुग्णालयांमध्ये रूग्णांवर मोबाईल वापरास बंदी घातली आहे.
UP govt bans use of mobile phones by patients in isolation wards of L-2 & L-3 dedicated #COVID19 hospitals. The mobile phones of such patients needs to be submitted to the ward incharge of the COVID care centre so as to ensure mobile phone infection prevention norms. pic.twitter.com/uMAZWDmsVK
— ANI UP (@ANINewsUP) May 23, 2020
डीजीच्या म्हणण्यानुसार मोबाईलमुळे कोरोनाचा संसर्ग पसरतो. यानंतर कोरोना वॉर्डमधील नवीन व्यवस्थेअंतर्गत रूग्णालयाच्या प्रभारींकडे 2 मोबाईल असतील. ज्याद्वारे रुग्ण आपल्या कुटुंबियांशी बोलू शकतील. एल-2 आणि एल-3 रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना आयसोलेशन वॉर्डामध्ये मोबाईल फोन ठेवण्याची परवानगी नाही, कारण यामुळे संसर्ग पसरतो असं या आदेशांमध्ये असे स्पष्ट केलेलं आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना आपल्या कुटुंबाशी बोलण्यासाठी दोन मोबाईल असतील, यांचा ते वापर करू शकतात. या फोनमध्ये इन्फेक्शन प्रिव्हेंशन कंट्रोल असणार आहे.
CoronaVirus News : धोका वाढला! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंताजनक आकडेवारीhttps://t.co/T4bNf9ljDy#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2020
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (24 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 6767 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,31,868 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 3867 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 73,560 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 54,440 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'हे' औषध ठरतंय आशेचा किरणhttps://t.co/yw0nH2NwdV#coronavaccine#CoronavirusCrisis#CoronaVirusUpdates
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धोका वाढला! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंताजनक आकडेवारी
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये मैत्रिणीला लपून-छपून भेटणं भाजपा नेत्याला चांगलंच पडलं महागात
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'हे' औषध ठरतंय आशेचा किरण
बापरे! एक चूक झाली अन् सर्वांना कळले डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स
CoronaVirus News : 1 जूनपासून धावणार 200 स्पेशल ट्रेन्स; प्रवासाआधी जाणून घ्या नवे नियम