CoronaVirus News : कोरोना हा व्हायरस नाही तर बॅक्टेरिया?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 08:28 AM2020-06-06T08:28:05+5:302020-06-06T08:29:04+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संदर्भातील अफवाही वेगाने पसरत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांहून अधिक झाली असून आतापर्यंत पाच हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळया माध्यमातून जागृती केली जाते. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत आपले हात धुणे आणि मास्कचा वापर करणे. याच दरम्यान अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हे व्हिडीओ इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
कोरोना संदर्भातील अफवाही वेगाने पसरत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कोरोना हा व्हायरस नाही तर बॅक्टेरिया आहे असं सांगण्यात आलं होतं. तसेच बॅक्टेरिया असल्याने Aspirin ने त्यावर उपचार करता येऊ शकतात असं देखील व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. मात्र आता पीआयबी फॅक्ट टीमने हा दावा खोटा ठरवा आहे. ही अफवा पसरवली जात असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Claim- A widely circulated video on social media claims that #Covid19 is a bacteria & which can be treated with aspirin#PIBFactCheck- This is #Fake. Coronavirus is a virus and there is no specific medicinal cure available yet. pic.twitter.com/ESPzEZ6WgT
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 4, 2020
कोरोना हा व्हायरस आहे आणि त्याच्यावर अद्याप तरी कोणतंही विशेष औषध किंवा लस उपलब्ध नसल्याचं पीआयबीने म्हटलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये कोरोना हा व्हायरस नसून बॅक्टेरिया आहे. लोकांच्या मृत्यूचं खरं कारण हे व्हायरस नाही तर बॅक्टेरिया असून त्यामुळे शरीरात काही बदल होतात आणि त्यांना जीव गमवावा लागतो. तसेच Aspirin ने यावर उपचार केले जाऊ शकतात असा दावा डॉक्टरांनी केल्याचं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. मात्र पीआयबीने या व्हायरल पोस्टमागचं सत्य जाणून घेतलं आहे.
CoronaVirus News : जवळपास 6800 मुलांना करण्यात आलं क्वारंटाईनhttps://t.co/085ewdsvME#coronavirus#CoronaUpdates#schoolsreopening#Students
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2020
भारत सरकारच्या प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरो (PIB) ने हा दावा फेटाळून लावला आहे. PIB फॅक्ट चेकच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावर आतापर्यंत कोणतंही औषध आलं नसल्याचं म्हटलं आहे. पीआयबी याआधीही कोरोनाशी संबंधित अनेक व्हायरल गोष्टींचं सत्य लोकांसमोर आणलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिल आहे.
कामगारांना परत कामावर बोलावणं हे व्यावसायिकांसाठी आव्हानhttps://t.co/5eK96UWvYR#CoronaUpdatesInIndia#coronavirus#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2020
कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सध्या बिकट अवस्था झाली आहे. सुमारे सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतरही मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या घटलेली नाही. मात्र आता देशाच्या आर्थिक राजधानीपेक्षा राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आहे. गेल्या तीन दिवसांत दिल्लीमध्ये कोरोनाचे सुमारे पाच हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याच्याबाबतीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे. तसेच देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या राज्यांच्या यादीत दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
CoronaVirus News : हॉटेलमध्ये जेवायला जायचंय... मग 'या' गोष्टी माहीत आहेत का?https://t.co/T9niDJLC1I#CoronaUpdatesInIndia#coronavirus#CoronaLockdown#hotels
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! 'या' जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त
CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; तब्बल 261 जणांना कोरोनाची लागण
CoronaVirus News : लवकर रेस्टॉरंट सुरू होणार, 'या' गोष्टी बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार?
CoronaVirus News : मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल; केलं असं काही...