CoronaVirus News : बापरे! कोरोनाग्रस्ताला आली पान मसाल्याची तलफ, रुग्णालयातून काढला पळ अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 03:34 PM2020-07-14T15:34:13+5:302020-07-14T15:43:23+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.
नवी दिल्ली - देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने नऊ लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,498 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 553 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63.02% झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.
उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये पान मसाल्याची तलफ आल्याने एका कोरोना रुग्णाने थेट रुग्णालयातून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील कंट्रोल रूमच्या कॅमऱ्यांना चकमा देत कोरोनाग्रस्त आयसोलेशन वॉर्डमधून पसार झाला. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. रुग्णाचा वेगाने शोध घेण्यात आला. रुग्णालय प्रशासनाने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर कोरोनाग्रस्ताचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा संसर्ग झाल्याने मृत्यूhttps://t.co/1FvZk0ufe5#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाग्रस्ताला पान मसाला खाण्याची तलफ आली. म्हणून त्याने रुग्णालयातून पळ काढला. रुग्णालयाजवळ पानाची टपरी दिसली नाही यामुळे त्याने टपरी शोधण्यासाठी थोडा प्रवास केला. यानंतर एका टपरीवरून त्याने पान मसाला विकत घेतला आणि आपली तलफ भागवली. तसेच तो एका मित्राच्या घरी देखील पोहचला. त्या कुटुंबाला याची काहीच कल्पना नसल्याने त्यांनी रुग्णाला घरात घेतले.
CoronaVirus News : डॉक्टरने रुग्णाचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यामागे 'हे' आहे कारण; वाचून तुम्हीही कराल भरभरून कौतुकhttps://t.co/6uolorHrGN#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#CoronaWarriors
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2020
कोरोनाग्रस्ताने मित्राच्या कुटुंबियांना आपल्याला खासगी रुग्णालयात दाखल करा अशी विनंतीही केली. मात्र याच दरम्यान रुग्णाचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आलं. पान मसाला खाण्यासाठी रुग्णालयातून पळ काढल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि अनेकांच्या जीव धोक्यात आला आहे. तसेच मित्राच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. डॉक्टरांनी या रुग्णाला सध्या विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. त्याची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मोदी सरकारने दणका दिल्यावर चीनचा सवाल, भारताने म्हटलं...https://t.co/c2ftr0pSCp#IndiaChinaFaceOff#chinaapps#TiktokBannedInIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CBSE Results 2020 : मोठी बातमी! CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर
चीनने 59 अॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर
बंगल्यात आणखी काही दिवस राहू द्या, प्रियंका गांधींनी केली मोदींना विनंती?, जाणून घ्या सत्य
Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा