CoronaVirus News : दीड महिन्यानंतर येऊ शकतं कोरोनावरील स्वस्त औषध, DGCIनं दिली 'क्लिनिकल ट्रायल'ची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 09:18 PM2020-05-08T21:18:28+5:302020-05-08T21:24:08+5:30
सीएसआयआरचे महासंचालक शेखर मांडे म्हणाले, 'एका आठवड्यात क्लिनिकल ट्रायलला सुरुवात करण्यात येईल. सीएसआयआर अनेक प्रतिष्ठित औषध कंपन्यांसोबत काम करत आहे आणि कोविड-19च्या उपचारावर औषध तयार करण्याच्या शक्यतांची पडताळणी करत आहे.
नवी दिल्ली - संपूर्ण जगातील वैज्ञानिक कोरोनावर औषध शोधण्याचा जीवतोडून प्रयत्न करत आहेत. भारतातही वेगवेगळ्या पद्धतीने ट्रायल सुरू आहे. आता याच पार्श्वभूमीवर, फेवीपिरवीर (Favipiravir) नावाच्या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी मिळाली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक (डीजी) शेखर मांडे यांनी सांगितले, की ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) फेवीपिरवीरसोबतच फायटोफार्मास्यूटिकल (Phytopharmaceutical) औषधाच्या क्लिनिकल ट्रायललाही मंजुरी दिली आहे. ही ट्रायल यशस्वी झाली, तर कोरोनावरील उपचारासाठी स्वस्त ओषध उपलब्ध होणार आहे.
आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका
एका आठवड्यात सुरू होईल ट्रायल -
सीएसआयआरचे महासंचालक शेखर मांडे म्हणाले, 'एका आठवड्यात क्लिनिकल ट्रायलला सुरुवात करण्यात येईल. सीएसआयआर अनेक प्रतिष्ठित औषध कंपन्यांसोबत काम करत आहे आणि कोविड-19च्या उपचारावर औषध तयार करण्याच्या शक्यतांची पडताळणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर काही कंपन्यांच्या सोबतीने गुरुवारपासून काही क्लिनिकल ट्रायलला सुरुवात करण्यात आली आहे. डीजीसीआयने आम्हाला दोन औषधांच्या क्लिनिकल ट्रायलची परवानगी दिली आहे. याला लवकरच सुरुवात केली जाईल.'
फायटोफार्मास्यूटिकल एक असे औषध आहे, जे वनस्पतीपासून तयार होते. यात अनेक प्रकारच्या कंपाउंड्सचे मिश्रण असते. मात्र, मुख्यतः हे एका वनस्पतीपासून निघते.
आणखी वाचा - CoronaVirus News: जूनमध्ये कोरोना हाहाकार माजवणार? आरोग्य मंत्रालयाने दिले 'असे' उत्तर
ट्रायल पूर्ण होण्यासाठी लागणार दीड महिना -
फेवीपिरवीर एक सुरक्षित औषध असल्याचे म्हणत, सीएसआयआरचे डीजी म्हणाले, 'या औषधाचे ट्रायल दीड महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर ट्रायल यशस्वी ठरले, तर लवकरच कोरोनावरील किफायतशीर औषध उपलब्ध होईल. याचे एक मुख्य कारण म्हणजे, फेवीपिरवीर एक जुने औषध आहे. याचे पेटंट आता एक्सपायर झाले आहे.
एका देशी औषधावरही क्लिनिकल ट्रायलची परवानगी -
फेवीपिरवीर औषधाचा वापर जपान, चीन आणि इतर काही देशांमध्ये इन्फ्लुएंजावरील उपचारासाठी होतो. सीएसआयआर एका देशी जडी-बुटीला जैविक औषध अथवा फायटोफार्मास्यूटिकलच्या रूपात विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. डेंग्यूवरील उपचारात याचा वापर होत आहे. आता यात कोविड-19 सोबत लढण्याची क्षमता आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनानं आतापर्यंत बदललीयेत शेकडो रुपं, वैज्ञानिकांचे हात अद्यापही रिकामेच