CoronaVirus News : बापरे! खूप काळजी घेतली तरी झाली कोरोनाची लागण?, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 05:51 PM2020-07-01T17:51:48+5:302020-07-01T18:32:56+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने सुचनांचं आणि नियमांचं पालन करा असं आवाहन करण्यात येत आहे.
नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या पाच लाखांच्या वर गेली आहे. तर आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने सुचनांचं आणि नियमांचं पालन करा असं आवाहन करण्यात येत आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग आणि क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. मात्र तरी देखील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खूप काळजी घेतली तरी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मात्र आता डॉक्टरांनी यामागचं महत्त्वाचं कारण सांगितलं आहे. मेडॉर रुग्णालयाचे वरिष्ठ डॉ. मनोज शर्मा यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटाझर यांचा वापर हे आपलं प्राथमिक पाऊल आहे. मात्र व्हायरसपासून वाचवण्यासाठी आपल्याला अधिक खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारीhttps://t.co/JfT79u5Jzr#CoronaVirusUpdates#CoronaOutbreak#corona#America
— Lokmat (@MiLOKMAT) July 1, 2020
"आता अनेक कार्यालये सुरू झाली आहेत. यामध्ये जेवणासाठी, चहा पिण्यासाठी जी भांडी असतात तीच आपण वापरतो. याच सवयीमुळे कोरोनाची लागण होऊ शकते. याशिवाय कार्यालयामध्ये एकाच संगणकाचा वापर अनेक जण करतात. यामुळे देखील कोरोनाचं संक्रमण वाढू शकतं. कार्यालयात आपण चहा एकत्र पितो आणि त्यावेळी आपल्या चेहऱ्यावरील मास्क हटवतो. यादरम्यान देखील कोरोना संक्रमण पसरण्याची शक्यता वाढते. तसेच टॉयलेटमध्ये जाताना दरवाजा उघडतानाही आपण हँडलला हात लावतो, यावरही व्हायरस असू शकतो" अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे.
CoronaVirus News : मृतदेहांचा 'तो' Video व्हायरल...https://t.co/CbAOtE9ctk#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 1, 2020
कार्यालयात गेल्यानंतर योग्य ती काळजी घ्या. वारंवार हात सॅनिटाइज करा आणि सोशल डिस्टन्सिंगचंही पुरेपूर पालन करा असा सल्ला देत आणखी काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. तसेच यामुळेच आपण कोरोनापासून आपलं रक्षण करू शकतो असं देखील शर्मा यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे.
मास्क लावायला सांगितला अन्... सरकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार, Video व्हायरलhttps://t.co/0ve8khc246#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#mask
— Lokmat (@MiLOKMAT) July 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"मोदींच्या मतदारसंघात कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट, घर गहाण ठेवून काढताहेत दिवस"
"महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार"; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या लिग्नाइट पॉवर प्लान्टमध्ये बॉयलरचा स्फोट; 6 जणांचा मृत्यू, 17 जखमी
CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
Video - संतापजनक! मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून कार्यालयातील दिव्यांग महिलेला बेदम मारहाण