CoronaVirus, LockdownNews: 17 मेनंतरही लॉकडाउन वाढणार का?; डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिलं 'असं' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 09:22 PM2020-05-09T21:22:44+5:302020-05-09T21:39:58+5:30
देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59,000वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 19,00हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन टप्प्या टप्प्याने उठवावा असेही म्हटले आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाउन दोन वेळा वाढवण्यात आला आहे. असे असतानाही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. या पुढेही लॉकडाउन वाढवायचा की नाही, यावर सरकार मंथन करत आहे.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन पुढे वाढेल, की नाही, हे अनेक गोष्टींवर विचार करून ठरवले जाईल. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. त्यांच्याशी सातत्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडून राज्यांच्या स्थितीची माहिती मिळाल्यानंतर, यासंदर्भात पंतप्रधान तज्ज्ञांची मदत घेतील. त्यांच्याशी सल्लामसलत झाल्यानंतरच लॉकडाउन पुढे वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील 135 कोटी जनतेचे हित लक्षात घेऊन अनेक निर्णय घेत असतात. लॉकडाउन वाढणार की नाही, यावर शेवटचा निर्णय 16 मेरोजीच समोर येईल, असे हर्षवर्धन म्हणाले. आज तकने आयोजित केलेल्या 'ई-एजेंडा' या कार्यक्रमात ते बोलत होते.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59,000वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 19,00हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन टप्प्या टप्प्याने उठवावा असेही म्हटले आहे.
आणखी वाचा - 40 कुटुंबांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश; पूर्वजांना औरंगजेबाने मुस्लीम बनवल्याचा दावा