CoronaVirus News : कोरोना संशयित रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबत महत्त्वाची माहिती; आरोग्य मंत्रालयाचे नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 11:26 AM2020-06-15T11:26:43+5:302020-06-15T11:29:49+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर अनेक ठिकाणी मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

CoronaVirus Marathi News dont wait for lab confirmation centres new protocol | CoronaVirus News : कोरोना संशयित रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबत महत्त्वाची माहिती; आरोग्य मंत्रालयाचे नवे नियम

CoronaVirus News : कोरोना संशयित रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबत महत्त्वाची माहिती; आरोग्य मंत्रालयाचे नवे नियम

Next

नवी दिल्ली -  देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर अनेक ठिकाणी मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना संशयित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार आता कुटुंबाकडे रुग्णाचा मृतदेह देण्याआधी रिपोर्टची गरज लागणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. रविवारी मंत्रालयाने दिल्ली सरकारला पत्र लिहिले आहे. यामध्ये कोविड-19 मुळे संशयित रुग्णांच्या लॅब रिपोर्टची वाट न पाहता मृतदेह हा कुटूंबाकडे सोपवावा, मात्र अंत्यसंस्कार हे सरकारने ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येतील असं सांगितलं आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही याबाबत एक ट्विट करून लोकांना माहिती दिली आहे. कोरोना संशियत रूग्णांचे मृतदेह कुटूंबाकडे देण्यासाठी रिपोर्टची वाट पाहू नये अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना पूर्ण खबरदारी घ्यावी असंही म्हटलं आहे. तसेच कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक (9115444155) देखील जारी केला आहे. या क्रमांकावर कॉल करून, ओपीडी अपॉईंटमेंट आणि वॉलंटियर्सशी बोलता येणार आहे. याव्यतिरिक्त, दिल्ली एम्समध्ये आरोग्य मंत्रालयाने एक कॉल सेंटर देखील तयार केले आहे.

कॉल सेंटरमधील डॉक्टर देशभरातील इतर डॉक्टरांना उपचारासाठी सल्ला देऊ शकतील. हे केंद्र 24 X 7 ही दिवस सुरू असेल. त्यामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी खाण्यापिण्याची सोय केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोना रुग्णांची 3 लाख 32 हजार 424 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 11 हजार 502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद केली गेली. तर 325 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतचे 'ते' फोटो पोस्ट करत असाल, तर....; सायबर सेलचा कडक इशारा

Sushant Singh Rajput Suicide: "सुशांत आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे"

CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...

Web Title: CoronaVirus Marathi News dont wait for lab confirmation centres new protocol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.