CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या संकटात देशातील 62 टक्के मुलांचं थांबलं शिक्षण, धक्कादायक अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 01:52 PM2020-07-12T13:52:15+5:302020-07-12T14:05:03+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याच दरम्यान शिक्षणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

CoronaVirus Marathi News education of children 62 percent disrupted due corona | CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या संकटात देशातील 62 टक्के मुलांचं थांबलं शिक्षण, धक्कादायक अहवाल

CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या संकटात देशातील 62 टक्के मुलांचं थांबलं शिक्षण, धक्कादायक अहवाल

Next

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल आठ लाखांवर गेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याच दरम्यान शिक्षणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

कोरोनाच्या संकटात देशातील तब्बल 62 टक्के मुलांचं शिक्षण थांबलं असल्याची चिंताजनक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. 15 राज्यांमधील 7235 कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं. यावरून जवळपास 62% कुटुंबांतील मुलांनी शिक्षण घेणं सोडलं असल्याची माहिती मिळते आहे.  सेव्ह द चिल्ड्रन या बाल-हक्कांसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेने हे सर्वेक्षण केलं असून 7 ते 30 जून दरम्यान ते करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात भारताच्या उत्तर भागातील 3827 कुटूंबाचा तर दक्षिणेकडील 556 गावांचा समावेश करण्यात आला. 

पूर्वेकडील भागातील 1722 घरांचा तर पश्चिम भागातील 1130 घरांचा या सर्वेक्षणात समावेश होता. अनेक ठिकाणी मुलांना मध्यान्ह भोजन देखील मिळत नसल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाने सर्व क्षेत्रांवर गंभीर परिणाम केले. बऱ्याच क्षेत्रांचे स्वरूपही पालटले. याचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या सर्वेक्षणादरम्यान राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या 82 टक्के विद्यार्थ्यांना कोरोनामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून 27 टक्के विद्यार्थी भविष्यात शिक्षण सुरू ठेवण्याची शक्यता अत्यंत धूसर असल्याचे समोर आले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : ट्रम्प यांचा 'हा' लूक पाहिलात का?, पहिल्यांदाच लावला मास्क अन्...

CoronaVirus News : "फक्त फुफ्फुसांवर नाही तर शरीरातील 'या' अवयवांवर हल्ला करतो कोरोना"

या देशाला आज मनमोहन सिंगांची गरज आहे, कारण...; शरद पवारांचं स्पष्ट मत

Bachchan Family Corona : जया बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! पीपीई किट परिधान करून पानवाला चालवतोय टपरी

Web Title: CoronaVirus Marathi News education of children 62 percent disrupted due corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.