CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला, छोट्या उद्योजकांना फायदेशीर ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 16:40 IST2020-06-15T16:38:46+5:302020-06-15T16:40:01+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संक्रमणादरम्यान जीवनावश्यक वस्तू, पीपीई किट्स, हँडवॉश, फेस मास्कचे उत्पादन व पुरवठा हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.

CoronaVirus Marathi News emphasis small entrepreneurs production essential items | CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला, छोट्या उद्योजकांना फायदेशीर ठरला

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला, छोट्या उद्योजकांना फायदेशीर ठरला

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसशी लढा देत असताना छोटया व्यावसायिकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरोना संक्रमणादरम्यान जीवनावश्यक वस्तू, पीपीई किट्स, हँडवॉश, फेस मास्कचे उत्पादन व पुरवठा हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. वॉलमार्टचे पुरवठादार असणाऱ्या बबिता गुप्ता आणि राहुल बजाज यांनी या व्यवसायात बाजी मारत छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन दिले आहे. फेस मास्क व हँडवॉश स्टेशन यांच्या निर्मितीत त्यांनी यश प्राप्त केले आहे. 

सारवी क्रिएशन्सच्या संस्थापक बबीता गुप्ता यांनी 2007 पासून घरगुती फर्निचर, फॅब्रिक आणि कापडी वस्तूंचा पुरवठा करत होत्या. मात्र कोरोनाने व्यवसाय धोक्यात आला. फेस मास्कची वाढती मागणी ओळखून, तिने स्वस्त दरात कापडी मास्क पुरवण्यासाठी हरियाणाच्या सोनपत येथील आपल्या फॅक्टरीत उत्पादन सुरू केले. नुकतीच बबिताने वॉलमार्ट बेस्ट प्राइसवरुन ८० हजार मास्कची पहिली ऑर्डर मिळवली आहे. 'कोरोनामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. मात्र त्याचा धीराने मुकाबला करण्याच्या विचारांनी मला मास्क व पीपीईंचे उत्पादन सुरू करण्यास प्रवृत्त केले. वॉलमार्टच्या वृद्धी टीमकडून मोठा पाठिंबा मिळाला. त्यांनी आर्थिक योजनांविषयी सरकारी सल्लामसलत आणि व्यावसायिक कामकाजाबद्दल मोलाचा सल्ला दिला. आमच्यासारख्या छोट्या व्यवसायासाठी वेबिनार त्यांनी आयोजित केले होते. यात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले' असं बबिता यांनी म्हटलं आहे. 

श्री शक्ती एंटरप्रायजेसचे संचालक राहुल बजाज यांची अशीच कोंडी झाली होती. सोनपतमध्ये त्याचे चार उत्पादन प्रकल्प बंद पडले. राहुल यांनी कारखान्यांपैकी एका ठिकाणी पायांच्या पॅडलमधून हात धुण्यासाठी स्टेशन बनवायला सुरुवात केली. अवघ्या तीन दिवसांत तयार केलेल्या पहिल्या नमुन्याला स्थानिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आज त्याला विविध उद्योग, सार्वजनिक आणि सरकारी संस्थांकडून हँड्सफ्री हँड वॉश स्टेशनसाठी 850 ऑर्डर्स मिळाल्या आहेत आणि लॉकडाऊन सुरू असतानाही विक्रीत 1.15 कोटी रुपये मिळवण्यास मदत केली आहे.

राहुल यांनी आमचा किचनवेअर व्यवसाय शून्यावर आला होता. आम्हाला व्यवसायात टिकून राहण्यास नवनिर्मितीचा विचार करणे गरजेचे होते. वॉलमार्टच्या सहकार्याने उत्पादनाची व्यवहार्यता आणि त्यावरील ऑफर समजून घेण्यास मदत मिळाली. व्यवसायविषयक बाबींसाठी वालमार्ट वृध्दीकडून बहुमूल्य मार्गदर्शन मिळाल्याचं म्हटलं आहे. डिसेंबर 2019 मध्ये सुरू केलेल्या वॉलमार्ट वृध्दी पुरवठादार विकास कार्यक्रमाअंतर्गत, स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेसाठी 50 हजार भारतीय एमएसएमईंना ‘मेक इन इंडिया’करण्यासाठी सक्षम बनवण्याचे उद्दीष्ट आहे.


 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : दिलासादायक! 'या' टेस्ट किटने चाचणी केली जाणार; फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार

CoronaVirus News : जूनमध्ये 'या' दिवशी कोरोना व्हायरस होणार नष्ट?; शास्त्रज्ञाचा अजब दावा

CoronaVirus News : तुम्ही हसलात की 'तो' ही हसणार; कोरोनापासून वाचवणारा हटके LED मास्क पाहिलात का?

Sushant Singh Rajput Suicide : "आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, न्यायालयीन चौकशी केली जावी"

CoronaVirus News : कोरोना संशयित रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबत महत्त्वाची माहिती; आरोग्य मंत्रालयाचे नवे नियम

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतचे 'ते' फोटो पोस्ट करत असाल, तर....; सायबर सेलचा कडक इशारा

Sushant Singh Rajput Suicide: "सुशांत आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे"

CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

Web Title: CoronaVirus Marathi News emphasis small entrepreneurs production essential items

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.