CoronaVirus News : कोरोनाचा धसका! अचानक लोक झाले गायब, 'या' गावातील 90 टक्के घरांना टाळं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 01:53 PM2020-08-28T13:53:04+5:302020-08-28T13:53:59+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे.
नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गुरुवारी कोरोनाचे 75,760 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे देशातील प्रमाण आता 76.24 टक्के झाले असून, त्यांची संख्या 25 लाखांवर पोहोचली आहे. मात्र कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे.
कोरोनाच्या भीतीने गावकरी गावातून गायब झाल्याची घटना समोर आली आहे. गावातील जवळपास 90 टक्के घरांना टाळं असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील एका गावात कोरोना व्हायरसमुळे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वेगाने वाढत असलेल्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली असल्याने हा अजब प्रकार पाहायला मिळत आहे. गुवाडी गावातील 90 टक्के घरांना टाळं लागलं आहे.
CoronaVirus News : कोरोनाची लागण झाल्यावर गावकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय, घटनेने एकच खळबळhttps://t.co/6WgGTFoVcR#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) August 26, 2020
अधिकारी गावात तपासणी आले असता हा अजब प्रकार समोर आला आहे. गावातील घरांना टाळं लागलेलं पाहून सर्वच जण हैराण झाले आहेत. इटावा ब्लॉकचे सीएमएचओ मेडिकल टीम सोबत गावात पोहोचले तेव्हा हा प्रकार समोर आला. गावात त्यामुळे आता खूप कमी लोक शिल्लक आहेत. गावातील काही लोक पहाटे 4 वाजता गायब झाले. त्यामुळे त्यांच्या घराबाहेर टाळं लागल्याची माहिती मिळत आहे.
CoronaVirus News : कोरोनासंदर्भात रिसर्चमधून समोर आली धक्कादायक माहितीhttps://t.co/ULi2vQkTFy#coronavirus#CoronaUpdates#COVID19
— Lokmat (@MiLOKMAT) August 26, 2020
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी गुवाडी गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर गावात 21 ऑगस्ट रोजी तब्बल 40 लोकांचे नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर गावातील 11 व्यक्ती पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. मेडिकल टीमने 7 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. मेडिकल टीम गावात आली असता हा सर्व प्रकार समोर आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा प्रसार होण्यामागे 'हे' लोक आहेत जबाबदार, वेळीच व्हा सावधhttps://t.co/3qs7HHgCvc#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) August 26, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा", भाजपा आमदाराचं थेट मोदींना पत्र
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोना लसीच्या चाचणीनंतर आनंदाची बातमी, 'हा' डोस ठरतोय संजीवनी
'चीनसोबत युद्ध झालं तर पाकिस्तानशीही युद्ध निश्चित', पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा
"केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक"; कोरोना लसीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल म्हणाले...
पुरावे नष्ट करण्याचा रियाचा प्रयत्न?, सुशांतचं घर सोडण्याआधी 8 हार्ड डिस्कमधला डेटा केला डिलीट