CoronaVirus Live Updates : रुग्णालयाचा भोंगळ कारभार! कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर 11 दिवस केले उपचार, रेकॉर्डमध्ये 'निरोगी'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 04:11 PM2021-09-16T16:11:35+5:302021-09-16T16:18:27+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: निरोगी असल्याचं सांगून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण रुग्णालयाच्या या निष्काळजीपणाचा रुग्णांच्या नातेवाईकांना आता त्रास सहन करावा लागत आहे.
नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. रुग्णालयाचा निष्काजीपणा कित्येकदा समोर आला आहे. अशीच भोंगळ कारभार दाखवणारी घटना आता समोर आली आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा आता रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत एक संतापजनक प्रकार उघड झाला आहे. एका रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अकरा दिवस उपचार केल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर त्यांना निरोगी असल्याचं सांगून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण रुग्णालयाच्या या निष्काळजीपणाचा रुग्णांच्या नातेवाईकांना आता त्रास सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकता कॉलनीमध्ये राहणाऱ्या रामनारायण श्रोती यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. पण उपचारानंतरही काही दिवसांनी रामनारायण यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी नेण्याचं ठरवलं. त्यानंतर काही दिवसांनी रामनारायण यांचा मृत्यू झाला. डेथ सर्टिफिकेट तयार करण्यासाठी गेले असता नातेवाईकांकडे डिस्चार्ज पेपर मागण्यात आला.
CoronaVirus News : 130 दिवसांचा लढा, महिनाभर व्हेंटिलेटर; ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णाने जिंकलं कोरोनाचं युद्ध#Corona#CoronavirusUpdates#coronavirushttps://t.co/naItAvAK1i
— Lokmat (@MiLOKMAT) September 16, 2021
माहितीच्या अधिकाराअंतर्गत झाली पोलखोल
नातेवाईकांनी रुग्णालयातून डिस्चार्ज पेपर घेतले नसल्याचं समोर आलं आहे. यावर रुग्णालयात चौकशी केली असता तुम्ही तुमच्या मर्जीने रुग्णांना घेऊन गेलात असं सांगण्यात आलं. डेथ सर्टिफिकेट हवं असल्याने माहितीच्या अधिकाराअंतर्गत याबाबत अर्ज करण्यात आला. यातून ही पोलखोल झाली आहे. रुग्णाच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आरटीआयच्या माध्यमातून माहिती मागवली. त्यामध्ये त्यांच्या वडिलांना 30 एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आल्याचं दाखवण्यात आलं. मात्र खरं तर 19 एप्रिल रोजीच वडिलांचा मृत्यू झाला होता.
चिंताजनक! 'या' राज्यात परिस्थिती गंभीर; डेंग्यूने घेतला 114 जणांचा बळी, रुग्णालयात बेडच नाही#Denguehttps://t.co/lRDoH4Tp6t
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2021
संतापजनक! कोरोना मृताला दाखवलं निरोगी
कोरोना वॉर्डमध्ये त्यांच्या केस शीटवर 20 ते 30 एप्रिल दरम्यान सतत इंजेक्शन आणि औषधं दिल्याचं बिल देण्यात आलं. तसेच वॉर्डच्या रेकॉरमध्ये 30 एप्रिलपर्यंत त्यांच्यावर उपचार होत असल्याचं दाखवण्यात आलं. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही सर्व माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रामनारायण यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या रेकॉर्डमध्ये रुग्ण निरोगी असल्याचा उल्लेख असल्याने काही समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! कोरोनाच्या संकटात लोकांचा हलगर्जीपणा ठरू शकतो घातक; तिसऱ्या लाटेचा धोका#CoronavirusUpdates#coronavirus#Coronahttps://t.co/dk8nT5Pffh
— Lokmat (@MiLOKMAT) September 14, 2021