CoronaVirus News : कोरोनामुळे बाप-लेकाची ताटातूट! नवजात बाळाला पाहण्यासाठी 'तो' व्याकूळ झाला पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 01:26 PM2020-06-04T13:26:29+5:302020-06-04T13:32:43+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नात्यामध्येही दुरावा आला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे एका बाप-लेकाची ताटातूट झाली आहे.

CoronaVirus Marathi News father lost life corona before seeing newborn son face | CoronaVirus News : कोरोनामुळे बाप-लेकाची ताटातूट! नवजात बाळाला पाहण्यासाठी 'तो' व्याकूळ झाला पण...

CoronaVirus News : कोरोनामुळे बाप-लेकाची ताटातूट! नवजात बाळाला पाहण्यासाठी 'तो' व्याकूळ झाला पण...

Next

गाझियाबाद - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन लाखांच्या वर गेली आहे. मुख्य म्हणजे यापैकी 1 लाख रुग्ण गेल्या 15 दिवसांतील आहेत. देशात पहिला रुग्ण केरळमध्ये 30 जानेवारी रोजी आढळला होता. त्यानंतर 18 मे रोजी म्हणजे तब्बल 110 दिवसांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख झाली आणि त्यानंतरच्या 15 दिवसांत आणखी 1 लाख रुग्णांची भर पडली. म्हणजेच देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. 

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नात्यामध्येही दुरावा आला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे एका बाप-लेकाची ताटातूट झाली आहे. आपल्या नवजात बाळाला पाहण्यासाठी बाप व्याकूळ होता पण मुलाचा चेहरा पाहण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गाझियाबादमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठ मेडिकल हॉस्पिटलमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू होते. त्याचदरम्यान त्याला बाळ झाले. बाळाला भेटण्याची इच्छा त्याने अनेकदा व्यक्त केली.

कोरोना झाल्यामुळे नवजात बाळाची भेट होणं शक्य नव्हतं. कोरोनामुळे आपल्या सात दिवसांच्या नवजात मुलाला भेटण्यापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळेच त्याला आपल्या बाळाचा चेहराही पाहता आला नाही. तरुणाला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. मेरठ रोड येथील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांना दाखवले. कोरोनाच्या संशयावरून त्याची चाचणी करण्यात आली. त्यानंतर चाचणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आले. उपचार सुरू होते मात्र त्याची प्रकृती ही चिंताजनक होती.

कोरोनामुळे त्याचं निधन झालं. तरुणाच्या कुटुंबातील आणखी तीन सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाला जेव्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी बाळाचा जन्म झाला. पत्नीने मुलाला जन्म दिला. बाळ आणि आई या दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. फोनवरून तरुणाला ही आनंदाची बातमी सांगितली होती तेव्हापासून तो बाळाला भेटण्यासाठी व्याकूळ झाला होता. मात्र कोरोनाने त्याचा मृत्यू झाला आणि तो बाळाचा चेहराही पाहू शकला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

'या' कंपनीचे तब्बल 74 कर्मचारी करोडपती झाले; CEO चे पॅकेजही 39 टक्क्यांनी वाढले

CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाची लढाई लवकरच जिंकता येणार; 'हे' औषध प्रभावी ठरणार

Mitron युजर्ससाठी अलर्ट! त्वरित डिलीट करा अ‍ॅप नाहीतर...

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'या' राज्याचा रेकॉर्ड; तब्बल 4.85 कोटी लोकांचं केलं स्क्रिनिंग

CoronaVirus News : ...अन् संरक्षणासाठी न्यायालयात गेलेल्या नवविवाहीत जोडप्याला ठोठावला 10 हजारांचा दंड

Web Title: CoronaVirus Marathi News father lost life corona before seeing newborn son face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.