CoronaVirus News: चिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 5,00000च्या पुढे, महाराष्ट्राची स्थिती सर्वात गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 10:57 PM2020-06-26T22:57:09+5:302020-06-26T23:11:09+5:30

देशात आज सकाळपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 490,401 एवढी होती. यात, कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूतील ताजे आकडे जोडले, तर आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखच्याही पुढे गेली आहे. 

CoronaVirus Marathi News five lakh covid 19 positive case found in india maharashtra delhi tamil nadu situation critical | CoronaVirus News: चिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 5,00000च्या पुढे, महाराष्ट्राची स्थिती सर्वात गंभीर

CoronaVirus News: चिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 5,00000च्या पुढे, महाराष्ट्राची स्थिती सर्वात गंभीर

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 5 हजारहून अधिक नवे रुग्ण.24 तासांत महाराष्ट्रात 5,024, देशाची राजधानी दिल्ली येथे 3,460, तर तामिळनाडूमध्ये 3,645 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत.देशात आज सकाळपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 490,401 एवढी होती.

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने आणि वेगाने वाढताना दिसत आहे. देशातील कोराना संक्रमितांचा आकडा आता पाच लाखांच्याही पुढे गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 5 हजारहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आज सकाळपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 490,401 एवढी होती. यात, कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूतील ताजे आकडे जोडले, तर आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखच्याही पुढे गेली आहे. 

covid19india.org वरील माहितीनुसार, देशात आता कोरोनाबाधितांची संख्या 5 लाखहून अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 5,024, देशाची राजधानी दिल्ली येथे 3,460, तर तामिळनाडूमध्ये 3,645 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. मात्र, देशातील एकूण कोरोनाबाधितांची अधिकृत आकडेवारी दुसऱ्या दिवशी सकाळी आरोग्यमंत्रालयाकडून जारी केली जाईल.

महाराष्ट्रात एकूण रुग्ण -
महाराष्ट्रात गेल्या 24 तासां तब्बल 5 हजार 24 नवे कोरोनाबाधित आढलून आले आहेत. हा आतापर्यंत राज्यात आढळलेल्या नव्या कोरोनाबाधितांचा सर्वात मोठा आकडा आहे. येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 1,52,765वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 65 हजार 829 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज 2,362 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत राज्यातील एकूण 79,815 रुग्ण कोरोनावर मात करून ठणठणीत बरे झाले आहेत.

महाराष्ट्रातील एकूण मृत्यू -
कोरोनामुळे महाराष्ट्रातील मरणारांची संख्याही सातत्याने वाढतच चालली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तब्बल 175 जणांचे मृत्यू नोंदवले गेले आहेत. त्यापैकी 91 मृत्यू गेल्या 48 तासांतील आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 7,106 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

मुंबईची स्थिती -
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबईत आज तब्बल 1, 297 नवे रुग्ण आढळून आले. येथे आतापर्यंत एकूण 72,175 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण मृतांचा आकडा 4,179 वर गेला आहे. सध्या मुंबईत एकूण 28,244 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या -

Good news: लवकरच संपणार कोरोनाचा कहर?; "वर्षभरात येऊ शकते कोरोना व्हॅक्सीन"

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार

Web Title: CoronaVirus Marathi News five lakh covid 19 positive case found in india maharashtra delhi tamil nadu situation critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.