CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 10:48 AM2020-05-12T10:48:21+5:302020-05-12T11:05:11+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्र आणि राज्य सरकारने गरिबांना मोफत आणि कमी किमतीत धान्य देण्याची योजना हाती घेतली आहे.

CoronaVirus Marathi News food ministry extends deadline aadhaar with ration cards SSS | CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा

Next

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव आणि कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देश आणि राज्यासमोर अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. सर्वच आर्थिक व्यवहार बंद असल्याने गरीब आणि हातावर पोट असलेल्यांवर अनेक ठिकाणी उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने गरिबांना मोफत आणि कमी किमतीत धान्य देण्याची योजना हाती घेतली आहे. याच दरम्यान रेशन कार्डधारकांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटात रेशन कार्डच्या नियमामध्ये एक बदल केला आहे. 

केंद्र सरकारने रेशन कार्डसंबंधी एका नियमात बदल केला असून या निर्णयाचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे. सरकारने रेशन कार्ड आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. सरकारने आता रेशन कार्डाला आधार क्रमांक जोडण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. रेशन कार्डाशी आधार क्रमांक न जोडल्यास ते रद्द करण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. अशा परिस्थितीत सरकारकडून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी आपला आधार कार्ड क्रमांक रेशन कार्डाला जोडलेला नाही. 

coronavirus: Now

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या 7 फेब्रुवारी 2017 रोजीच्या अधिसूचनेच्या आधारे सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना रेशनकार्ड आधार क्रमांकाशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच आधार क्रमांक नसल्यामुळे कोणाचेही रेशन कार्ड रद्द होणार नसल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. तसेच सरकारने आधार क्रमांक जोडला नसेल तरी रेशन कार्डधारकाला धान्य मिळत राहणार असल्याची माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

केंद्र आणि राज्य सरकारने गरिबांना मोफत आणि कमी किमतीत धान्य देण्याची योजना हाती घेतली आहे. मात्र या योजनेचा लाभ केवळ पिवळ्या रेशन कार्डधारक आणि अन्नसुरक्षा योजनेतील पात्र कुटुंबानाच मिळत होता. मात्र केशरी रेशन कार्ड आणि 59 हजार ते 1 लाख उत्पन्न असलेल्यांना हे धान्य मिळत नव्हते. त्यामुळे या लोकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.  कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईच्या पार्श्वभूमीवर कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच ज्यांचे उत्पन्न 59 हजार ते 1 लाख रूपयांपर्यंत असणाऱ्या केशरी कार्डधारकांना 8 रूपये प्रति किलो या दराने गहू आणि 12 रूपये दराने प्रति किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नागरी पुरवठा विभागाचे संचालक कैसाल पगारे यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारण

CoronaVirus News : "कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचे शोषण नको"

CoronaVirus News : होम क्वारंटाईन कधी संपणार?; आरोग्य मंत्रालयाकडून नियमात मोठा बदल

 

Web Title: CoronaVirus Marathi News food ministry extends deadline aadhaar with ration cards SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.