CoronaVirus News: भारतात कोरोना टेकतोय गुडघे; ...तर लवकरच वाढणार ठणठणीत होणाऱ्यांचा आकडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 10:29 AM2020-06-02T10:29:17+5:302020-06-02T10:43:49+5:30
महाराष्ट्र आणि दिल्लीतसह काही इतर राज्यांत कोरोना रुगाणांची संख्या वाढत आहे. यामुळे चिंताही वाढत आहे. मात्र परिस्थिती वाईट नाही.
नवी दिल्ली : देशात कोरोनाविरोधातील लढाई युद्धपातळीवर सुरू आहे. या जीवघेण्या व्हायरसवर मात करण्यासाठी प्रत्येक राज्यानेच मोठी तयारी केली आहे. कोरोनाच्या विळख्यात अडकणाऱ्यांचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. मात्र आनंदाची बातमी ही, की कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्याही देशात घटली आहे. अर्थातच देशातील कोरोनाबाधीत ठणठणीत बरे होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हळूवार का होईना, पण देशात कोरोना गुडघे टेकताना दिसत आहे. हीच परिस्थिती कायम राहीली, तर लवकरच देशात संक्रमित होणाऱ्यांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक होईल.
CoronaVirus News: ...तर फक्त स्वप्नच बनून राहणार 'चमत्कारिक' कोरोना व्हॅक्सीन? अतिघाई पडेल महागात
मृत्यूचे प्रमाण घटले -
45 दिवसांपूर्वी कोरोनामुळे मरणारांचे प्रमाण 3.3 टक्के एवढे होते. आता ते कमी होऊन 2.83 टक्क्यांवर आले आहे. 18 मेरोजी हाच मृत्यू दर 3.15 टक्के होता, तर 3 मरोजी 3.25 टक्के होता. सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील एका दिवसात सर्वाधिक मृत्यूचा आकडा 230 एवढा आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 5,394 जणांचा मृत्यू झाला असून 1 लाख 90 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
George Floyd death: अमेरिकेत 52 वर्षांनंतर सर्वात मोठा हिसाचार; 40 शहरांमध्ये कर्फ्यू
ठणठणीत होणाऱ्यांचा आकडा वाढला -
देशात आतापर्यंत 93,322 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 91,818 जण कोरोनातून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासांत 4,835 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या 8 मेच्या गाइडलाइन्सनुसार, सामान्य आणि मध्यम स्वरुपाच्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणे वाढली नाही, तर त्यांना 10 दिवसांनंतर स्वस्थ घोषित करण्यात येत आहे. याचाच अर्थ भविष्यात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आणखी वेगाने वाढू शकते.
रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा -
कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेटही वाढला आहे. आता देशाचा रिकव्हरी रेट 48.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डेटानुसार18 मेला रिकव्हरी रेट 38.29 टक्के होता, 3 मेरोजी तो 26.59 टक्के होता, तर 15 एप्रिलला 11.42 टक्के होता. देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतील रिकव्हरी रेट वेगवेगळा आहे. मात्र, एकंदर परिस्थिती दिलासादायक आहे.
धक्कादायक दावा! चीन नव्हे, युरोपात होता कोरोनाचा पहिला रुग्ण; नोव्हेंबरमध्ये समोर आली होती पहिली केस
आता कोरोना केसेस वाढतील, पण..
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की स्थलांतरीत मजूर आपल्या घरी गेले आहेत. लॉकडाउनमध्ये सवलत दिली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते. मात्र, अधिकाधिक टेस्ट आणि रुग्णांची लवकरात लवकर रिकव्हरी, हे सरकारचे ध्येय आहे.
महाराष्ट्र आणि दिल्लीत चिंता -
महाराष्ट्र आणि दिल्लीतसह काही इतर राज्यांत कोरोना रुगाणांची संख्या वाढत आहे. यामुळे चिंताही वाढत आहे. मात्र परिस्थिती वाईट नाही.
"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'
इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती उत्तम -
आरोग्य विभागानुसार, जागतीक स्थरावर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण 6.19 टक्के आहे. फ्रान्समध्ये सर्वाधिक 19.35 टक्के, बेल्जियममध्ये 16.25 टक्के, इटलीत 14.33 टक्के, तर इंग्लंडमध्ये 14.07 टक्के आहे.