CoronaVirus खूशखबर! देशातील आणखी एक राज्य झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:41 PM2020-05-09T22:41:50+5:302020-05-09T22:47:22+5:30
सर्व रुग्ण बरे झाल्याने गोवा कोरोनामुक्त जाहीर करण्यात आले होते.
नवी दिल्ली : गेल्या दीड महिन्यांपासून कोरोनाचा कहर पाहणाऱ्या देशाला कोरोनामुक्त होण्याच्या आशेचे किरण दिसू लागले आहेत. देशातील ३५००-४००० च्या आसपास गेल्या काही दिवसांपासून घुटमळणारे आकडे चिंताजनक आहेत. मात्र, या काळातच एक आनंदाची बातमी आहे. गोव्यानंतर आणखी एक राज्य कोरोनामुक्त झाले आहे.
हे राज्य मिझोराम आहे. या राज्यात असलेला एकमेव कोरोनाबाधित आज बरा झाला आहे. हा धर्मगुरु नेदरलँडला जाऊन आला होता. ५० वर्षीय धर्मगुरु कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. गेल्या २४ तासांत या धर्मगुरुच्या चार टेस्ट करण्यात आल्या. त्या सर्व निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आल्याचे मिझोरामचे आरोग्य मंत्री ललथंगलिआना यांनी सांगितले.
आमच्या राज्यात आता एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने मिझोरामला कोरोनामुक्त राज्य घोषित करण्यात यावे. या बातमीमुळे कोरोनाविरोधात लढणाऱ्य़ा कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
याआधी गोव्यामध्ये ७ रुग्ण होते. मात्र, सर्व रुग्ण बरे झाल्याने गोवा कोरोनामुक्त जाहीर करण्यात आले होते. दरम्यान देशात कोरोनाचे 59,662 रुग्ण झाले असून 1,981 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 17,847 जण बरे झाले आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus ...पण अर्थव्यवस्थाही पहावी लागेल; नितीन गडकरींचे लॉकडाऊनवर संकेत
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २०००० पार; दिवसभरात ४८ मृत्यू
CoronaVirus in Mumbai चिंताजनक! मुंबईत मृतांच्या आकड्यात वाढ; ७२२ नवे रुग्ण
लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार
अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच गायब असण्याचे सांगितले कारण
इराण सौदी अरेबियावर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकणार; तेलावरून वाजल्याने अमेरिकेने सुरक्षा काढली
महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन