CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येने गाठला आतापर्यंतचा उच्चांक; चिंताजनक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 10:07 AM2020-05-29T10:07:28+5:302020-05-29T10:08:38+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

CoronaVirus Marathi News Highest 7,466 new COVID19 cases 24 hours country SSS | CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येने गाठला आतापर्यंतचा उच्चांक; चिंताजनक आकडेवारी

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येने गाठला आतापर्यंतचा उच्चांक; चिंताजनक आकडेवारी

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 59 लाखांवर गेली आहे. तर तब्बल 362,024 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 7,466 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 175 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 165799  वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 4706  लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी (29 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 7,466 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या  1,65,799 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 89987 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 71105 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे.

भारतात कोरोनाविरूद्ध 9 औषधांची चाचणी सुरू आहे. नीति आयोग (आरोग्य) सदस्य व्ही के पॉल यांनी याबाबत माहिती दिली. देशातील सुमारे 20 नवीन कंपन्या कोविड 19 साठी चाचणी किट बनवित आहेत. जुलैपर्यंत देशात दररोज 5 लाख देशी किट तयार होतील. कोरोनाच्या विरूद्ध भारत अनेक लस चाचण्या घेत असल्याची माहिती पॉल यांनी दिली. कोविड 19 विरुद्धची अंतिम लढाई केवळ लसीद्वारेच जिंकली जाईल. आपल्या देशात त्यासाठी प्रयत्न सुरू आहे अशी माहिती व्ही के पॉल यांनी दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात नवा प्रयोग; 'या' शहरात सुरू झाले 'धन्वंतरी रथ'

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण! देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी

CoronaVirus News : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; आईला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याने मुलाचं भयंकर कृत्य

CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांचा आकडा 57 लाखांवर; 'या' देशात एकही मृत्यू नाही तर काही ठिकाणी गंभीर स्थिती

CoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला

CoronaVirus News : बापरे! 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर

Web Title: CoronaVirus Marathi News Highest 7,466 new COVID19 cases 24 hours country SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.