CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! कोरोनाचा भीतीदायक रेकॉर्ड; गेल्या 24 तासांत तब्बल 10,956 नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 11:22 AM2020-06-12T11:22:18+5:302020-06-12T11:28:20+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

CoronaVirus Marathi News highest single-day spike 10,956 new cases | CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! कोरोनाचा भीतीदायक रेकॉर्ड; गेल्या 24 तासांत तब्बल 10,956 नवे रुग्ण

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! कोरोनाचा भीतीदायक रेकॉर्ड; गेल्या 24 तासांत तब्बल 10,956 नवे रुग्ण

googlenewsNext

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 75 लाखांच्या वर गेली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 2 लाख 97 हजारांवर पोहोचली आहे. 

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 10,956 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 396 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,97,535 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आठ हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 

शुक्रवारी (12 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 10,956 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दोन लाख 97 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आठ हजारांवर पोहोचला आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला आढळून आला होता. त्यानंतर शंभर दिवसांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखावर गेली. त्यापुढील पंधरवड्यात आणखी एक लाख रुग्ण वाढले.

देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने खासगी लॅब्सना देखील कोरोना चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी या लॅब रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेत असल्याचं उघड झालं आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये खासगी लॅब्सने तब्बल 35 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला. मात्र ते सर्व जण निगेटिव्ह असल्याचं आता स्पष्ट झालं. या घटनेने खासगी लॅबचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. मात्र या दरम्यान निगेटिव्ह लोकांना तीन दिवस कोरोना रुग्णांसोबत आयसोलेशन वॉर्डमध्ये राहावे लागल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! 14 मृतदेहांचा 'तो' धक्कादायक Video व्हायरल

"आता आपल्याकडे मौनेंद्र मोदी आहेत ते..."; भारत-चीन सीमावादावरून पंतप्रधानांवर निशाणा

CoronaVirus News : बापरे! तब्बल 35 निगेटिव्ह लोकांना दिला कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट अन्...

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्याला यश येणार, मांजरींवरील 'हे' औषध प्रभावी ठरणार?

देशातील प्रत्येक नागरिकाला रिलीफ फंडातून मिळणार 7500 रुपये?

CoronaVirus News : धोक्याची घंटा! कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू

Web Title: CoronaVirus Marathi News highest single-day spike 10,956 new cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.