CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 10:36 AM2020-06-28T10:36:47+5:302020-06-28T10:37:54+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.लोूलोू

CoronaVirus Marathi News highest single spike 19,906 new COVID19 cases | CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 1 कोटीच्या पुढे गेली असून 5 लाखांहून अधिक जणांनी यामुळे जीव गमावला आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असून आकडेवारी नवा उच्चांक गाठत आहे. 

देशातील रुग्णसंख्येने पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 19,906 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 410 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 5,28,859 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 16,095 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (28 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 19,906 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाच  लाख 28 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सोळा हजारांवर पोहोचला आहे. 

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,03,051 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,09,713  रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असतानाच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 58 टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी (27 जून) याबाबतची माहिती दिली आहे. तसेच जवळपास तीन लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा तीन टक्के आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा 19 दिवसांवर पोहचला आहे. लॉकडाऊनच्या आधी हे प्रमाण 3 दिवसांवर होते अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली. 

हर्षवर्धन यांनी देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वेगाने वाढते आहे. भारतासाठी ही चांगली गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. 30 जानेवारीला देशात  पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला होता. यानंतर 110 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी ही संख्या 1 लाखावर गेली होती. यानंतर कोरोनाच्या संक्रमणाचा वेग एवढा वाढला की, केवळ 15 दिवसांतच हा आकडा दोन लाखावर गेला. यानंतर हा आकडा तीन लाख होण्यासाठी 10 दिवस लागले. हा वेग आणखी वाढून 4 लाखांवर हा आकडा जाण्यासाठी 8 दिवस लागले. तर चार लाखांवरून पाच लाखांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ 6 दिवसांचा कालावधी लागला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : "देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासमोर पंतप्रधानांचे सरेंडर", राहुल गांधींचा हल्लाबोल

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशाचा रिकव्हरी रेट 58%, जवळपास 3 लाख लोकांनी केली कोरोनावर मात

Google Pay चा वापर करणं धोकादायक, खरंच RBI ने घातली बंदी?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण

CoronaVirus News : राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्या दोघांना लागण

Coronil : कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल

घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड, नोंदवा कुटुंबातील सदस्याचं 'नाव'; जाणून घ्या कसं

CoronaVirus News : "कोरोनावर लस विकसित झाली तरी..."; बिल गेट्स यांचं चिंताजनक वक्तव्य

Web Title: CoronaVirus Marathi News highest single spike 19,906 new COVID19 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.