CoronaVirus News: दिलासादायक! एम्सच्या अभ्यासात HCQ प्रभावी; '2-3 महिन्यात तयार होईल कोरोनावरील औषध'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 04:11 PM2020-06-06T16:11:08+5:302020-06-06T16:26:47+5:30

लक्षणे न दिसणाऱ्या संसर्गग्रस्ताला रुग्णालयात भर्ती होणे आवश्यक नाही. त्यांनी घरातच योग्य प्रकारे वेगळे रहायला हवे. लक्षणे न दिसणारे 99 टक्के लोक असेच बरे होतात.

CoronaVirus Marathi News Hydroxychloroquine useful in coronavirus says aiims director randeep guleria  | CoronaVirus News: दिलासादायक! एम्सच्या अभ्यासात HCQ प्रभावी; '2-3 महिन्यात तयार होईल कोरोनावरील औषध'

CoronaVirus News: दिलासादायक! एम्सच्या अभ्यासात HCQ प्रभावी; '2-3 महिन्यात तयार होईल कोरोनावरील औषध'

googlenewsNext
ठळक मुद्देलक्षणे न दिसणारे 99 टक्के लोक असेच बरे होतात.डेथ रेटला लगाम घालण्यास आपल्याला यश आले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. जर याला आळा घालायचा असेल आणि मृत्यू थांबवायचे असतील तर, सावध व्हावे लागेल.

नवी दिल्ली : एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी Unlock-1.0मध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने इशारा दिला आहे. ते म्हणाले, 'लॉकडाउन उठताच सोशल डिस्टंसिंगचे पालन कमी झाले आहे. कोरोना अजूनही आहे. कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. जर याला आळा घालायचा असेल आणि मृत्यू थांबवायचे असतील तर, सावध व्हावे लागेल. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. सर्वच लोक अचानकपणे बाहेर निघू लागले आहेत.'

सध्या रोजच जवळपास 10 हजार कोरोनाबाधित समोर येत आहेत, यावर गुलेरिया म्हणाले, 'भारताची लोकसंख्या फार अधिक आहे. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढेल. त्यामुळे आपल्याला डेथ रेटवर लक्ष द्यायला हवे. डेथ रेट कमी आणि संख्या अधिक असेल तर, फारसा त्रास होणार नाही. पॉझिटिव्ह केसेस वाढत असल्या तरी घाबरू नका. डेथ रेटला लगाम घालण्यास आपल्याला यश आले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.

आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया

डॉक्टर गुलेरिया यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरही यावेळी भाष्य केले. ते म्हणाले यावर अभ्यास सुरू आहे. आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे. त्यानुसार, हे औषध लाभदायक आहे. हे सुरक्षित औषध आहे. यामुळे अधिक सायडिफेक्ट होत नाहीत. ज्या लोकांनी हे औषध घेतले होते, त्यांच्यात कोरोना व्हायरसची लक्षणे कमी प्रमाणात दिसून आली. मात्र, कुठल्याही ठोस निष्कर्षावर पोहोचने योग्य होणार नाही.

सौदी-कुवेतमध्ये PUBGवरून पेटला वाद, 'या'मुळे मुस्लिमांमध्ये पसरलीय नाराजी!

गर्मीशी कोरोनाचा काहीही संबंध नाही. हा एक महा व्हायरस आहे. काही दिवस राहणारच. व्हॅक्सीनसाठी अद्याप वेळ लागेल. हे वर्ष संपेपर्यंत अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला व्हॅक्सीन येईल. मात्र, पुढील दोन-तीन महिन्यात औषध तर येईलच, असेही गुलेरिया म्हणाले.

दिलासादायक!: "ऑक्‍टोबरपर्यंत तयार होईल कोरोना व्हॅक्‍सीन?"; जाणून घ्या, भारतासह जगातील 10 लेटेस्ट अपडेट्स

एम्स डायरेक्टर गुलेरिया म्हणाले, लक्षणे न दिसणाऱ्या संसर्गग्रस्ताला रुग्णालयात भर्ती होणे आवश्यक नाही. त्यांनी घरातच योग्य प्रकारे वेगळे रहायला हवे. लक्षणे न दिसणारे 99 टक्के लोक असेच बरे होतात. मात्र, ते कोरोना पसरवू शकतात. ही फार गंभीर समस्या आहे. त्यामुळे अशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्यांनी आयसोलेशनमध्ये रहायला हवे.

जाणून घ्या, काय आहेत पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'

Web Title: CoronaVirus Marathi News Hydroxychloroquine useful in coronavirus says aiims director randeep guleria 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.