CoronaVirus News : चिंताजनक! 'या' राज्यातील मृत्यूदर देशात सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 09:04 PM2020-05-04T21:04:18+5:302020-05-04T21:10:32+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात 2,553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. याच दरम्यान एक चिंताजनक बाब समोर आली आहे.
कोलकाता - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 42 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 42 हजार 533 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (4 मे) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 2,553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. याच दरम्यान एक चिंताजनक बाब समोर आली आहे.
कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे देशात पश्चिम बंगाल राज्यात सर्वाधिक आहे. देशातील सर्वात जास्त म्हणजे 12.8 टक्के मृत्यूदर हा या राज्यात नोंदवला गेला आहे. इंटर मिनिस्ट्रियल सेंटर टीम (IMCT) ने याबाबत माहिती दिली आहे. आयएमसीटीचे सदस्य अपूर्व चंद्रा यांनी पश्चिम बंगालचे प्रधान सचिव राजीव सिन्हा यांना याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी आयएमसीटीची टीम पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आली होती. चंद्रा यांनी पत्राद्वारे सिन्हा यांना राज्यातील परिस्थिती कळवली आहे.
We are leaving West Bengal today after 15 days. We visited many locations&made report as per our observation. Report will be submitted to the Centre. Primary observation is that improvement is needed: Vineet Joshi, IMCT Team Leader for Darjeeling, Jalpaiguri&Kalimpong. #COVID19pic.twitter.com/EINEE51hIc
— ANI (@ANI) May 4, 2020
अपूर्व चंद्रा यांनी पश्चिम बंगाल राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर देशात सर्वाधिक आहे. तसेच अतिशय कमी चाचण्या घेणे, दक्षता न बाळगणे आणि योग्य प्रकारे ट्रॅकिंग न ठेवण्याचा हा परिणाम असल्याचं स्पष्ट होत असल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल राज्य सरकारने आपल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये नमूद केलेल्या कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आणि केंद्र सरकारने त्या संख्येबाबत दिलेल्या माहितीत विसंगती समोर आली असल्याचे चंद्रा यांनी पत्रात नमूद केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली; 11,706 जणांनी लढाई जिंकलीhttps://t.co/Asx2Pfvtkt#CoronaUpdatesInIndia#COVID2019india
— Lokmat (@MiLOKMAT) May 4, 2020
कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली असून 11,706 जणांनी लढाई जिंकली आहे. जवळपास 27.5 टक्के लोकांनी कोरोनावर मात केली आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक भागांत नागरिकांना काही सूट देण्यात आली असली तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याची जबाबदारी आता नागरिकांवर आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणीही जाणं टाळा. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना केलं आहे.
CoronaVirus News : धक्कादायक! एकामुळे तब्बल 55 कोरोना वॉरियर्सना कोरोनाची लागण, 'हे' आहे कारणhttps://t.co/cta0gzHpsU#CoronaUpdatesInIndia#CoronaWarriors
— Lokmat (@MiLOKMAT) May 4, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली; 11,706 जणांनी लढाई जिंकली
CoronaVirus News : धक्कादायक! एकामुळे तब्बल 55 कोरोना वॉरियर्सना कोरोनाची लागण, 'हे' आहे कारण
CoronaVirus News : संतापजनक! मजूर दाम्पत्याला शौचालयात केलं क्वारंटाईन, फोटो व्हायरल
CoronaVirus News : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आता घरबसल्या शेतमालाची विक्री, सरकारने लाँच केलं अॅप
CoronaVirus News : ...म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी डॉक्टरांच्या नावावरून ठेवलं आपल्या मुलाचं नाव
CoronaVirus News : दारुसाठी काय पण! तळीरामांना सोशल डिस्टंसिंगचाही विसर, पोलीस आले अन्...